मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गुंतवणूक न करता Cryptocurrency तून कमवा पैसे, नुकसान झाल्यास होईल 5 हजारांचा फायदा

गुंतवणूक न करता Cryptocurrency तून कमवा पैसे, नुकसान झाल्यास होईल 5 हजारांचा फायदा

आपल्या देशातही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. अशा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातल्या कंपन्या विविध आकर्षक योजना राबवत आहेत.

आपल्या देशातही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. अशा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातल्या कंपन्या विविध आकर्षक योजना राबवत आहेत.

आपल्या देशातही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. अशा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातल्या कंपन्या विविध आकर्षक योजना राबवत आहेत.

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर: क्रिप्टोकरन्सी ( Crypto Currency) म्हणजेच आभासी चलनाविषयी असलेली अपुरी माहिती, गैरसमज, कायदेशीर मंजुरी नसणं अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या देशात क्रिप्टो मार्केटमध्ये (Crypto Market) गुंतवणूक करण्याचं प्रमाण इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूपच कमी आहे. असंख्य जणांना याची माहितीही नाही. गुन्हेगारी जगतातल्या आर्थिक उलाढालीसाठी याचा वापर केला जात असल्याचीही चर्चा असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार यापासून दूर राहणंच पसंत करतो; मात्र आधुनिक तंत्रज्ञानाशी जवळीक असणारी तरुण पिढी याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. त्यामुळे आपल्या देशातही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. अशा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातल्या कंपन्या विविध आकर्षक योजना राबवत आहेत. क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातल्या क्रॉस टॉवर (Cross Tower) या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मनेही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नुकतीच एक विशेष योजना जाहीर केली आहे. क्रॉस टॉवरने क्रिप्टोकरन्सीत व्यवहार करण्यासाठी प्रत्येक भारतीय युझरला 5000 रुपयांचं विनामूल्य क्रेडिट (Free Credit) देण्याची घोषणा केली आहे.

यामुळे, युझर कोणतीही गुंतवणूक न करता क्रिप्टो ट्रेडिंग (Crypto Trading) शिकू शकतील आणि कमाई करू शकतील असं क्रॉस टॉवरने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीयांसाठी ही अशा प्रकारची पहिलीच संधी आहे, जिथे युझर स्वतः कोणतीही गुंतवणूक न करता क्रिप्टो ट्रेडिंग शिकून त्यातून नफा कमवू शकतात. युझर 5000 रुपयांचं विनामूल्य क्रेडिट घेऊन त्याद्वारे अनेक चलनांसह व्यापार करू शकतात. क्रिप्टोची किंमत कमी झाली, तर क्रॉस टॉवरचे नुकसान होईल; पण युझरचं कोणतंही नुकसान होणार नाही, असंही कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा-  700% चा भरभक्कम रिटर्न! 5 रुपयांचा हा स्टॉक पोहोचला ₹42 वर, 6 महिन्यात गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले ₹8.39 लाख

 याबाबत अधिक माहिती देताना क्रॉस टॉवर इंडियाचे सीईओ विकास आहुजा म्हणाले, 'भारतीयांमध्ये क्रिप्टो क्षेत्राविषयी जागरूकता आणि स्वारस्य वाढत आहे. हे लक्षात घेऊन क्रॉस टॉवरने ही अनोखी सुविधा दाखल केली आहे, ज्याचा फायदा भारतीय युझर घेऊ शकतील. युझरने केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि बँक तपशील दिल्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी ते 5000 रुपयांच्या विनामूल्य क्रेडिटसाठी दावा करू शकतात. यातून मिळणारा नफा त्यांना सहज आपल्या खात्यात जमा करता येतो; मात्र या विनामूल्य क्रेडिट्सचा वापर केवळ क्रॉस टॉवर प्लॅटफॉर्मवर व्यवहार करण्यासाठी केला जाऊ शकतो. युझर ही रक्कम वॉलेटमध्ये हस्तांतरित करू शकत नाहीत किंवा काढून घेऊ शकत नाहीत.'

हेही वाचा-  PNB Mega E-auction: खरेदी करता येईल खिशाला परवडणारं स्वत:चं घर, PNB देत आहे संधी

या सुविधेमुळे नवीन युझर्सना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा अनुभव घेता येईल आणि यातून चांगला परतावा कसा मिळवायचा हे लक्षात येईल, असंही कंपनीनं म्हटलं आहे.

First published:

Tags: Investment, Money