• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Sovereign Gold बाँड्स आजपासून विक्रीसाठी खुले, जाणून घ्या किंमत इतर महत्त्वाचा तपशील

Sovereign Gold बाँड्स आजपासून विक्रीसाठी खुले, जाणून घ्या किंमत इतर महत्त्वाचा तपशील

भौतिक सोन्याची (Physical Gold) मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने काही वर्षांपूर्वी सॉव्हरीन गोल्ड बाँडस (Sovereign Gold Bonds) ही योजना दाखल केली.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: भारतीयांमध्ये चकाकणाऱ्या सुवर्ण धातूबद्दल (Gold) विशेष प्रेम आहे. सोने ही गुंतवणूकीचा सहज सोपा आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. तसंच सोने खरेदी ही एक परंपरा आहे. त्यामुळे भारत हा जगातला सर्वांधिक सोने आयात करणारा दुसरा देश आहे. सोने आयातीसाठी प्रचंड प्रमाणात परकीय चलन (Foreign Currency) खर्च करावं लागतं. हा खर्च कमी करण्यासाठी आयात कमी होणं आवश्यक आहे. त्याकरता भौतिक सोन्याची (Physical Gold) मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने काही वर्षांपूर्वी सॉव्हरीन गोल्ड बाँडस (Sovereign Gold Bonds) ही योजना दाखल केली. यामध्ये रोख्यांच्या स्वरुपात  (Bonds)काही वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केली जाते आणि मुदतीदरम्यान त्यावर व्याजही (Interest)दिलं जातं. आर्थिक वर्ष 2021-22 साठी आजपासून (25 ऑक्टोबर) हे गोल्ड बाँडस विक्रीसाठी खुले होत आहेत. 29 ऑक्टोबरपर्यत यात गुंतवणूक करता येणार आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत या गोल्ड बाँडसची आणखी चार फेऱ्यांमध्ये विक्री केली जाईल, असे अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे. हेही वाचा-  ICICI बँकेचे शेअर ऑल टाईम हायवर; गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं म्हणणं काय?
 केंद्र सरकारच्या वतीने भारतीय रिझर्व्ह बँक हे गोल्ड बाँडस जारी करणार असून, बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्स्चेंज यांच्या मार्फत या गोल्ड बाँडसची विक्री होईल. योजना जाहीर होण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन दिवसांत इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनने प्रकाशित केलेल्या 999 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या बंद किंमतीच्या सरासरीच्या आधारावर गोल्ड बाँडसची किंमत निश्चित केली जाईल.ऑनलाइन खरेदी आणि डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी सॉव्हरीन गोल्ड बाँडसची किंमत 50 रुपयांनी कमी असेल.
सॉव्हरीन गोल्ड बाँडसची मुदत आठ वर्षांची असते. यावर गुंतवणूकदारांना दरवर्षी 2.50 टक्के दराने निश्चित व्याज मिळते. किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागते. कमाल मर्यादा प्रति व्यक्ती चार किलोग्राम आहे. पाचव्या वर्षानंतर गुंतवणूकदारांना त्यातून बाहेर पडता येते. यासाठी केवायसीचे नियम प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यासाठीच्या नियमाप्रमाणेच आहेत. हेही वाचा-  IPO Update : या आठवड्यात दोन आयपीओ ओपन होणार; गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?
 सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सुवर्ण मुद्रीकरण योजनेंतर्गत ही गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. रिझर्व्ह बँक या योजनेच्या अटी आणि शर्ती वेळोवेळी जारी करते. प्रत्येक अर्जासोबत पॅन नंबर अनिवार्य आहे. भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था या योजनेत गुंतवणूक करू शकतात. स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका वगळता सर्व बँका (Banks),स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस (Post Office)आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड एनएसई (NSE)आणि मुंबई स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात बीएसई (BSE)सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजद्वारे बाँडची विक्री केली जाते.
हेही वाचा-  इंधन दरवाढीचं टेन्शन का घ्यायचं? 71 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री मिळवा, कसं?
या योजनेमुळे गुंतवणूकदारांना सोने खरेदी करून ते सुरक्षित ठेवण्यासाठी खर्च करावा लागत नाही, तर यावर व्याजही मिळते. मुदतीनंतर त्यावेळी असणाऱ्या सोन्याच्या दराचा लाभही मिळतो. मुदतीनंतर मिळालेल्या रकमेचा वापर करून गुंतवणूकदार आवश्यकतेप्रमाणे सोने खरेदी करू शकतो.
Published by:Pooja Vichare
First published: