• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम: गुंतवा अवघे 50 हजार आणि खात्यात जमा होईल 'इतकी' पेन्शन

पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम: गुंतवा अवघे 50 हजार आणि खात्यात जमा होईल 'इतकी' पेन्शन

पोस्ट ऑफिसनं (Post Office Investment scheme) सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी एक भन्नाट स्कीम आणली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: आजकालच्या काळात खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन (Best Pension Scheme) मिळत नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर नक्की काय करणार आणि घर कसं चालवणार याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. मात्र आता चिंता करू नका. कमीतकमी पैशांमध्ये जास्तीत जास्त पेन्शन मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसनं (Post Office Investment scheme) सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी एक भन्नाट स्कीम आणली आहे. पोस्ट ऑफिसद्वारे मासिक उत्पन्न योजना (Monthly Investment Scheme) आणण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना नियमित मासिक पेन्शन मिळते. या योजनेमध्ये, एकाच वेळी एकरकमी रक्कम गुंतवणं आवश्यक आहे. पोस्ट ऑफिस एमआयएस योजना सध्या गुंतवणुकीवर 6.6 टक्के वार्षिक व्याज (Annual Interest) देत आहे.  विशेष म्हणजॆ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार योजनेत जॉईंट अकाउंटसुद्धा उघडू शकणार आहेत. हे वाचा - 'Govt Yojana' चा कोणता SMS तुम्हालाही आला आहे का? तर वेळीच व्हा सावधान! गुंतवा अवघे 50 हजार आणि पेन्शन पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम अकाउंट स्कीममध्ये फक्त 50,000 रुपये गुंतवून तुम्हाला योजनेमध्ये 3300 रुपये पेन्शन मिळू शकते. पाच वर्षांच्या एकूण कालावधीसाठी, गुंतवणूकदारांना परिपक्वतापूर्वी एकूण 16500 रुपये व्याज म्हणून मिळतात. मात्र अधिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही योजनेमध्ये अधिक पैसे गुंतवू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही एमआयएस योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर वर्षी 6600 रुपये पेन्शन किंवा 550 रुपये दरमहा मिळतील. उदाहरणार्थ जर तुम्ही साडे चार लाख रुपयेण्या स्कीममध्ये गुंतवले तर तुम्हाला महिन्याला 2475 रुपये तर दर वर्षी 29700 रुपये शकतात. म्हणजेच जितके जास्त पैसे तुम्ही गुंतवाल तितकीच जास्त पेन्शन तुम्हाला मिळू शकेल.
  Published by:Atharva Mahankal
  First published: