• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Multibagger Stock: 10 वर्षात 1 लाखाचे झाले 1 कोटी, तुम्ही देखील हा शेअर खरेदी केलाय का?

Multibagger Stock: 10 वर्षात 1 लाखाचे झाले 1 कोटी, तुम्ही देखील हा शेअर खरेदी केलाय का?

Invest in Share Market: या शेअरने अवघ्या 10 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. तुम्ही देखील हा शेअर विकत घेतला आहे का?

  • Share this:
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असा एखादा शेअर आहे का, ज्याने शेअर बाजारात एक लाख रुपयांचे एक कोटी रुपये केले आहेत? कदाचित नसावा. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरची (What is Multibagger share) माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या 10 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. वैभव ग्लोबल (Vaibhav Global) असं या शेअरचं नाव आहे. ही एक जेम्स अँड ज्वेलरी कंपनी आहे. 10 वर्षांपूर्वी, म्हणजेच 16 सप्टेंबर 2011ला NSEवर वैभव ग्लोबलची किंमत अवघी 7.13 रुपये होती. शुक्रवारी, म्हणजेच 17 सप्टेंबर 2021ला हाच शेअर (Vaibhav Global share price) तब्बल 718 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजेच, दहा वर्षांमध्ये या शेअरची किंमत चक्क 100 टक्क्यांनी वाढली होती. 2021च्या मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात वैभव ग्लोबलचा एक शेअर 996.70 रुपयांवर पोहोचला होता. यानंतर कित्येक लोकांनी प्रॉफिट बुक करत शेअर्स विकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे हा शेअर पुन्हा खाली (Vaibhav Global share trend) आला. मात्र, त्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये वैभव ग्लोबलची किंमत 510.42 रुपयांवरून वाढून 718 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के रिटर्न (Vaibhav Global share returns) दिला आहे. गेल्या एका वर्षाचा ट्रेंड पाहिला, तर या कंपनीच्या शेअरची किंमत 375.77 रुपयांपासून वाढून 718 रुपयांवर पोहोचल्याचं दिसून येईल. हे वाचा-कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून मिळणार रेशन कार्डाशी संबंधित या सुविधा Online गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहिली, तर या कंपनीने 62.29 रुपयांपासून वाढत जाऊन 718 रुपयांपर्यंत 105 टक्के एवढा दमदार रिटर्न दिला आहे. तसेच, गेल्या दहा (Share Market tips) वर्षांची आकडेवारी पाहून तर कोणाचेही डोळे पांढरे होतील. अवघ्या 7.13 रुपयांवरून वाढत जाऊन या कंपनीच्या एका शेअरची किंमत आज 718 रुपये आहे. हे वाचा-नोकरी बदलल्यानंतर ट्रान्सफर करायचे आहेत PF चे पैसे? जाणून घ्या सोपी पद्धत म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 31 डिसेंबर 2020ला या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्यांची किंमत 1.40 लाख रुपये झाली असती. तसेच, पाच लाखांपूर्वी गुंतवलेल्या 1 लाखांचे आज 11.50 लाख रुपये झाले असते. मात्र, सगळ्यात जास्त फायदा त्यांचा झाला असता, ज्यांनी दहा वर्षांपूर्वी यात एक लाख रुपये गुंतवले, आणि पुढे पूर्णवेळ या कंपनीशी प्रामाणिक राहिले. कारण, आकडेवारीनुसार, या एक लाखांचे आज चक्क एक कोटी रुपये झाले असते.
First published: