मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ठरणार फायद्याची, भरभक्कम कमाईची सुवर्णसंधी!

सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ठरणार फायद्याची, भरभक्कम कमाईची सुवर्णसंधी!

काल सोनं महागलं होतं, पण आज चांगली बातमी आहे. सोन्याच्या भावात 70 रुपयांनी घसरण होऊन सोनं 35,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. चांदी मात्र महागलीय. ती 660 रुपयांनी वाढून 40,190 रुपये झालीय.

काल सोनं महागलं होतं, पण आज चांगली बातमी आहे. सोन्याच्या भावात 70 रुपयांनी घसरण होऊन सोनं 35,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. चांदी मात्र महागलीय. ती 660 रुपयांनी वाढून 40,190 रुपये झालीय.

कोरोना व्हायरसच्या आपत्तीनंतर जागतिक स्लोडाउन (Global Slowdown) पुन्हा एकदा भेडसावायला लागली आहे. त्याचवेळी 2020 या वर्षाच्या सुरूवातीपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे भाव 40 हजारांपुढेच आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरणारी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच सोन्याचे भाव वधारलेले पाहायला मिळाले. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर 42 हजारापर्यंत पोहोचले होते. यानंतर सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळाला, मात्र अद्यापही सोन्याचे भाव 40 हजारांपेक्षा अधिकच आहेत. गेल्यावर्षी सोन्याच्या भावात आधीच्या वर्षापेक्षा 25 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे यंदा होणारी वाढ लक्षात घेता, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक किती फायद्याची ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सोन्यात गुंतवणूक फायदेशीर कशी? अनेक म्युच्युअल फंड मॅनेजर्सच्या मते सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे पोर्टफोलिओ (Investment Portfolio) सुधारण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे जगभरात सुरू असलेल्या विविध समस्यांमुळे बचतीबाबत अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय आहे. त्याचप्रमाणे अर्थशास्त्रातील सर्वच घटकांचा व्यापक विचार केला तर सोन्याला फार महत्त्व आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली नसेल तर याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. जेव्हा जागतिक स्तरावर काही संकट येतं, त्यावेळी सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक चांगले रिटर्न्स देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे Geo Political तणावाच्या वेळी देखील सोन्याचे भाव वधारतात. (हेही वाचा : रुपया घसरल्यामुळे सोनं झालं महाग, वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव का?) सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत जागतिक स्लोडाउन होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर Equity Marketमध्ये अस्थिरता येण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे काही केंद्रीय बँकांमध्ये सुस्ती पाहायला मिळत आहे. अमेरिका-चीनमधील ट्रेड डीलसुद्धा अद्याप पूर्ण झालेली नाही. या सर्व शक्यता लक्षात घेत्या सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या पारंपरिक पद्धतीव्यतिरिक्त इतर पर्याय सणासुदीचे किंवा लग्नसराईचे दिवस सोडले तर 2013 नंतर थेट सोने खरेदी करण्यापेक्षा इतर पर्यायांना ग्राहकांनी पसंती दिली आहे. सोन्याची नाणी किंवा दागिने विकत घेण्याऐवजी ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पेटीएम गोल्ड, सॉव्हरीन गोल्ड बाँड, गोल्ड ETF यासांरख्या पर्यायांमधून तुम्ही गुंतवणूक करू शकता. MCX गोल्ड या पर्यायातून तुम्हाला कमीतकमी 1 ग्रॅम सोनं खरेदी करण्याचा पर्याय मिळतो आहे. गुंतवणुकीसाठी Gold Mutual Fund एक उत्तम पर्याय सोन्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून जर भरभक्कम कमाई करण्याचा तुमचा मानस असेल अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पेपर गोल्डच्या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते. गोल्ड म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. गेल्यावर्षी आदित्य बिर्ला सनलाइफ गोल्ड फंड, SBI गोल्ड फंड, निप्पोन इंडिया गोल्ड सेव्हिंग फंड, कोटक गोल्ड फंड, अक्सिस गोल्ड फंड, ICICI प्रुडेंशिअल रेग्युलर गोल्ड सेव्हिंग्स फंड, HDFC गोल्ड सेव्हिंग्स फंड यातून चांगली गुंतवणूक झाली आहे.
First published:

Tags: Gold, Investment and return

पुढील बातम्या