Home /News /money /

दर महिन्याला मिळतील 5 हजार रुपये रिटर्न; Post Office च्या या योजनेत करा गुंतवणूक

दर महिन्याला मिळतील 5 हजार रुपये रिटर्न; Post Office च्या या योजनेत करा गुंतवणूक

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.

नवी दिल्ली, 01 जुलै : पोस्ट ऑफिस विभागाच्या आर्थिक गुंतवणूक योजनांमुळे सामान्य नागरिक तिथं गुंतवणूक सुरक्षित आहे असं मानतात, विशेषतः उर्वरित आयुष्य व्यथित करण्यासाठी निवृत्तीनंतर पोस्टात (पोस्ट ऑफिस) गुंतवणुकीवर भर देण्याकडे ज्येष्ठांचा कल दिसून येतो. पोस्टाच्या अनेक योजना (schemes) या ग्राहकांना आकर्षित करत असतात. त्यातीलच एक पोस्ट पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न' (POMIS) होय, यामध्ये गुंतवणूकदारांना हमीने चांगला परतावा (Guaranteed refund) मिळतो. सध्या या योजनेत 6.6 टक्के इतका व्याज दर मिळत आहे. आणि या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. खरं तर, पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना गुंतवणुकीसाठी (Investment) अतिशय सुरक्षित मानल्या जातात. यामुळेच असे लोक ज्यांना धोका (Risk) पत्करायचा नाही, ते अशा छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सरकारच्या पाठिंब्यामुळे ग्राहकांचा पोस्टावर अधिक विश्वास आहे. यासोबतच परतावाही निश्चित मिळतो. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्याला गुंतवणुकीवर मॅच्युरिटीनंतर किती पैसे मिळतील हे माहीत असते. हे वाचा - Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून नवी नियम लागू; काय होईल फायदा? पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न' योजना ही देखील अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये चांगला परतावा मिळतो. या योजनेत वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळते. या योजनेतील गुंतवणूक पाच वर्षांनी मॅच्युअर (Maturity) होते. म्हणजेच, 5 वर्षानंतर ग्राहकाला मासिक उत्पन्नाची हमी मिळू लागते. ती आणखी पाच वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. जर खातेदार (account holder) मॅच्युरिटीपूर्वी मरण पावला, तर पैसे नॉमिनीला (Nominee) दिले जातात. या योजनेत फक्त 1000 रुपयांत खाते उघडता येते. महिन्याला मिळेल अशी रक्कम या योजनेत 6.6 टक्के वार्षिक व्याज दिलं जात आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये 9 लाख रुपयांची गुंतवणूक संयुक्त खात्याद्वारे (Joint Account) केली असेल तर त्याला वार्षिक 6.6 टक्के दराने 59,400 रुपये मिळतील. एका महिन्याचा विचार केल्यास ते 4,950 रुपये हे गुंतवणूकदार दर महिन्याला घेऊ शकतात. ही फक्त व्याजाची रक्कम आहे, गुंतवणूकदाराची मूळ रक्कम ही तेवढीच राहील. योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो या योजनेत 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. यामध्ये वैयक्तिक आणि संयुक्त अशी दोन्ही खाती उघडता येतात. तसंच एक व्यक्ती एका खात्यात जास्तीतजास्त 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकते. हे वाचा - LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन कसा भराल? या योजनेत, 1 वर्षापूर्वी ठेव काढता येत नाही. दुसरीकडे, जर कालावधी पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच, 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले गेले, तर ते वजा केल्यावर मूळ रकमेपैकी 1 टक्का कापून रक्कम परत केली जाते. जर तुम्ही मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर पैसे काढले तर तुम्हाला योजनेचे सर्व फायदे मिळतील.
First published:

Tags: Investment, Money, Post office, Post office saving, Savings and investments

पुढील बातम्या