Home /News /money /

रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट ठरू शकते फायद्याची, कशी आणि कोणते घटक ठरतील महत्वाचे, चेक करा

रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट ठरू शकते फायद्याची, कशी आणि कोणते घटक ठरतील महत्वाचे, चेक करा

रियल इस्टेट डेव्हलपर्स संघटना असलेल्या क्रेडाईनं (CREDAI) दिलेल्या माहितीनुसार, घरांच्या किमतींमध्ये लवकरच 10 ते 15 टक्क्यांपर्यत वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटमधील इन्व्हेस्टमेंट फायद्याची ठरू शकते.

मुंबई, 14 मे : गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून जगावर कोरोनाचं संकट आहे. त्यापैकी सुरुवातीच्या वर्षभरात वेळोवेळी लॉकडाउन लागू करण्यात आलं. सर्व क्षेत्रांतले उद्योगधंदे आणि व्यवसायांना याचा फटका बसला. अगदी रिअल इस्टेटसारखं (Real Estate) स्थिर मानलं जाणारं क्षेत्रदेखील यातून वाचू शकलं नाही. त्यामुळे रिअल इस्टेट गुंतवणूकदारांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आता हळूहळू या स्थितीमध्ये सुधारणा होत आहे. न्यू नॉर्मलनंतर रिअल इस्टेट बिझनेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या बांधकाम साहित्याच्या (Construction Material) किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून होम लोनचे व्याजदरसुद्धा महागले आहेत. जमिनीचे आणि घरांचे दर (House Prices) वाढत आहे. रियल इस्टेट डेव्हलपर्स संघटना असलेल्या क्रेडाईनं (CREDAI) दिलेल्या माहितीनुसार, घरांच्या किमतींमध्ये लवकरच 10 ते 15 टक्क्यांपर्यत वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटमधील इन्व्हेस्टमेंट फायद्याची ठरू शकते. याबाबत माहिती देणारं वृत्त 'फायनान्शिअल एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलं आहे. रिअल इस्टेट बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कसं फायद्याचं ठरू शकतं हे याठिकाणी सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. mAadhaar App: कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस हाय रिटर्न पोटेन्शिअल सध्या अर्थव्यवस्था कोरोनाच्या भयंकर आव्हानातून सावरत आहे. येत्या दशकात विकासाचा वेग प्रचंड असेल. मूडीज (Moody’s) या फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अंदाजानुसार, येत्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. या अंदाजातून भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian Economy) क्षमता दिसते. रिअल इस्टेट इन्व्हेस्टर्सनी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीजचा (Under-construction Property) विचार केल्यास त्यांना सात ते 10 वर्षांच्या काळात हाय रिटर्न मिळू शकतात. रेसिडेन्शिअल सेगमेंट व्यतिरिक्त कमर्शिअल रिअल इस्टेट गुंतवणूकदेखील जोर धरत आहे. रेंटल इन्कम मिळवणं हा गुंतवणुकीचा एकमेव उद्देश असेल तर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये पैसा गुंतवू शकता. लो इनपुट कॉस्ट रिअल इस्टेट सेक्टर पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे रिअल इस्टेट डेव्हलपर्स घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणत आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याने, गुंतवणूकदार प्रत्यक्ष किमतीच्या केवळ पाच ते 10 टक्के प्रॉपर्टीज बुक करू शकतो. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने किंवा डेव्हलपरच्या पेमेंट प्लॅननुसार दिली जाऊ शकते. अशा प्रकारे, इनपुट कॉस्ट (Input Cost) ही रेडी-टू-मूव्ह-इन हाउसिंग युनिटच्या (Housing Unit) अधिग्रहणासाठी वापरल्या गेलेल्या अमाउंटचा फक्त एक भाग आहे. 2022 मध्ये डेव्हलपर्स गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचण्यास पूर्वीपेक्षा अधिक उत्साही दिसत आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांनी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीजचा विचार केला पाहिजे. Health Insurance घेताना 'या' गोष्टी तपासून घ्या, अन्यथा गरजेच्या वेळी होईल मनस्ताप परवडणारे व्याजदर अभूतपूर्व महामारीच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असताना कर्ज वितरणालाही वेग आला आहे. आतापर्यंत होम लोनवरचे (Home Loan) व्याजदर सर्वांत कमी होते. आता त्यामध्ये वाढ झाली असली, तरी ती परवडणारी आहे. नॅशनलाइज्ड बँका (Nationalized Banks) 6.50 ते 10 टक्के दरानं होम लोन देत आहेत, तर नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) 6.90 ते 12 टक्के दराने होम लोन देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमी व्याजदराचा लाभ घेण्यासाठी आणि अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. शिवाय, होम लोन डेव्हलपर्सच्या (Developers) पेमेंट प्लॅनसोबत सिंक केलं जाऊ शकतं, जेणेकरून बांधकामाचे टप्पे पूर्ण झाल्यावर हप्ता रिलीज केला जाईल. आकर्षक ऑफर्स संभाव्य घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी रेप्युडेट रिअल इस्टेट डेव्हलपर्स आकर्षक सवलती, फ्री फर्निशिंग, लो बुकिंग कॉस्ट, मुद्रांक शुल्क सवलत, स्थगित पेमेंट योजना, ग्रुप डिस्काउंट आणि विशिष्ट वेळेसाठी विनामूल्य क्लब फॅसिलिटी देत आहेत. सीरिअस बायर्सना आकर्षित करण्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून प्रोजेक्टचा विचार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी डेव्हलपर्स या युक्त्या करत आहेत. ज्या गुंतवणूकदारांना काही वर्षांनंतर भाड्यातून उत्पन्न मिळवायचं आहे ते यामध्ये गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक एक वर्कहॉर्स (Workhorse) बनू शकते. एकूणच, 2022 हे वर्ष रिअल इस्टेट गुंतवणूकदारांना अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक करण्याची अतिशय चांगली संधी देतं आहे. कारण, सुरुवातीचा गुंतवणूक खर्च कमी आहे आणि भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. असं असलं, तरी बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी लोकेशन, डेव्हलपरचं रेप्युटेशन, रेरा (RERA) रजिस्ट्रेशन आणि कनेक्टिव्हिटीसारख्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
First published:

Tags: Investment, Money, Real estate

पुढील बातम्या