मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mutual Funds: म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक देईल मोठा नफा, जाणून घ्या कसं

Mutual Funds: म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक देईल मोठा नफा, जाणून घ्या कसं

सामान्य गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड हा सर्वांत सोपा पर्याय आहे. ठराविक काळाने आणि सातत्याने त्यात गुंतवणूक केली तर गुतंवणुकीबद्दल अजिबात माहिती नसलेली व्यक्तीही अनुभवी गुंतवणूकदारापेक्षा उत्तम कमाई करू शकते. जाणून घ्या कसं

सामान्य गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड हा सर्वांत सोपा पर्याय आहे. ठराविक काळाने आणि सातत्याने त्यात गुंतवणूक केली तर गुतंवणुकीबद्दल अजिबात माहिती नसलेली व्यक्तीही अनुभवी गुंतवणूकदारापेक्षा उत्तम कमाई करू शकते. जाणून घ्या कसं

सामान्य गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड हा सर्वांत सोपा पर्याय आहे. ठराविक काळाने आणि सातत्याने त्यात गुंतवणूक केली तर गुतंवणुकीबद्दल अजिबात माहिती नसलेली व्यक्तीही अनुभवी गुंतवणूकदारापेक्षा उत्तम कमाई करू शकते. जाणून घ्या कसं

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: ‘सामान्य गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड हा सर्वांत सोपा पर्याय आहे. ठराविक काळाने आणि सातत्याने त्यात गुंतवणूक केली तर गुतंवणुकीबद्दल अजिबात माहिती नसलेली व्यक्तीही अनुभवी गुंतवणूकदारापेक्षा उत्तम कमाई करू शकते.’ असं महान गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी शपथेवर सांगितलं आहे. तसंच नुकत्यात कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटिजने केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की तीन आणि पाच वर्षांच्या काळात 60 टक्के म्युच्युअल फंडांनी त्यांच्या बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत खूप कमी कमाई करून दिली आहे. जागतिक स्तरावरही बहुतांश म्युच्युअल फंडांना हा ट्रेंड बदलता आलेला नाही. एस अँड पी डाउ जोन्स इंडायसेस 2021 वार्षिक एसपीआयव्हीए रिपोर्टनुसार (S&P Dow Jones Indices 2021 annual SPIVA report) अमेरिकेतील अ‍ॅक्टिव्हली मॅनेज केल्या जाणाऱ्या 80% म्युच्युअल फंडांनीही त्यांचा बेंचमार्क इंडेक्स गाठलेला नाही. अमेरिकेतील सुमारे 40 टक्के म्युच्युल फंडांनी पॅसिव्ह फंडांत गुंतवणूक केल्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण याचा काय फरक पडतो? हेही वाचा -  UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करणं होणार महाग; डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शनसाठीही लागणार शुल्क अ‍ॅक्टिव्हविरुद्ध पॅसिव्ह अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंडात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे मार्केटमधील कोणत्याही परिस्थितीत नफा मिळवून देण्यासाठी झटणारा फंड मॅनेजर. अर्थात एकूण अ‍ॅसेट्स अंडर मॅनेजमेंटचा (assets under management (AUM)) अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च म्हणून त्याला AUM च्या 0.5 ते 2.5 टक्क्यांपर्यंत फी द्यावी लागते. दुसरीकडे पॅसिव्ह फंडाला नियमित मॅनेजमेंटची गरज भासत नाही. यात बेंचमार्क इंडेक्स रेप्लिकेट केला जातो. मार्केटमधील आधीच्या ट्रेडचं रिफ्लेकशन वापरून या फंडाचं काम चालतं. तूर्तास बीएसई सेन्सेक्समध्ये बँकिंग आणि फायनान्स क्षेत्राचा वाटा 31.89 टक्के आहे. त्यामुळे जो इंडेक्स फंड या 30 स्ट्राँग इंडेक्सवर लक्ष ठेवून आहे तो या क्षेत्रात त्याच पटीत गुंतवणूक करतो. म्हणजेच काय यासाठी विशेष प्रावीण्य असण्याची गरज नाही. एकूण खर्च म्हणजे एयूएमच्या एक टक्का खर्च हा एका टक्क्यापलीकडे कधीही जात नाही. परवडणारे आणि सहज प्रवेश करता येणारे असल्याने नवे गुंतवणूकदार पॅसिव्ह फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाच्या ( Association of Mutual Funds of India (AMFI)) जुलै 2022 च्या रिपोर्टनुसार 95 इंडेक्स फंडांमध्ये 6,770.23 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 2022च्या पहिल्या तिमाहीतही या फंडांत 19,086.27 कोटींची गुंतवणूक झाली आहे. हेही वाचा -  Petrol-Diesel Rate : दोन शहरांमध्ये पेट्रोल स्वस्त, पाहा तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर निवेश मंथन या मासिकाचे संपादक आणि अनुभवी म्युच्युअल फंड विश्लेषक राजीव रंजन झा म्हणाले,‘ इंडेक्स फंड कमी किमतीत जास्त फायदा मिळवून देतात म्हणून नव्या गुंतवणूकदारांनी त्यातच गुंतवणूक करावी.इंडेक्स फंडात काही परिणामांना अनुसरून चांगले रिटर्न देणाऱ्या फंडांचीच निवड केली जाते. त्यामुळे इंडेक्स फंड हा तुमच्या पोर्टफोलियोत असायलाच हवा.’ पण तुमच्या पोर्टफोलिओतून अक्टिव्ह फंड पूर्णपणे वगळू मात्र नका. कारण या अभ्यासातून असं दिसलंय की गेल्या 10 वर्षांत 80 अक्टिव्ह फंडांनी त्यांच्या बेंचमार्कपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक सल्लागार संजीव दावर म्हणाले, ‘ गेल्या काही वर्षांत अ‍ॅक्टिव्हच्या तुलनेत पॅसिव्ह फंडांतील गुंतवणूकीकडे कल वाढला आहे. सहजतेमुळे गुंतवणूकदार त्या फंडाकडे आकर्षित झाले आहेत. पण अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही फंडांतील समतोल गुंतवणूकच मला योग्य वाटते. अ‍ॅक्टिव्ह फंडांतील गुंतवणूक कठीण काळात कायम उपयोगी पडते.’
First published:

Tags: Business, Mutual Funds

पुढील बातम्या