Home /News /money /

शेअर बाजारात दमदार एन्ट्री केलेले 'स्टार्टअप' शेअर्स आपटले, गुंतवणूकदारांचं हजारो कोटींचं नुकसान

शेअर बाजारात दमदार एन्ट्री केलेले 'स्टार्टअप' शेअर्स आपटले, गुंतवणूकदारांचं हजारो कोटींचं नुकसान

आजच्या ट्रेडिंग सत्रात, स्टार्टअप कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे ज्यांची 2021 मध्ये दमदार लिस्टिंग झाली होतीॉ. सोमवारी Nykaa, Zomato, Paytm, Policy Bazaar, CarTrade Tech या शेअर्सना जोरदार फटका बसला आहे.

    मुंबई, 24 जानेवारी : सोमवारी शेअर बाजारात (Share Market) झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम संपूर्ण बाजारावर दिसत आहे. सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. पण आजच्या ट्रेडिंग सत्रात, स्टार्टअप कंपन्यांना (startup Companies) सर्वाधिक फटका बसला आहे ज्यांची 2021 मध्ये दमदार लिस्टिंग झाली होतीॉ. सोमवारी Nykaa, Zomato, Paytm, Policy Bazaar, CarTrade Tech या शेअर्सना जोरदार फटका बसला आहे. Paytm चे शेअर्स 900 रुपयांच्या खाली पेटीएमच्या स्टॉकमधील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पेटीएमचा स्टॉक 900 रुपयांच्या खाली गेला आहे. पेटीएमचा शेअर ८ टक्क्यांच्या घसरणीसह 885 रुपयांच्या जवळ ट्रेड करत आहे. शेअर लिस्ट झाल्यानंतर सर्वात नीच्चांकी पातळीवर आहे. Zomato स्टॉकमध्येही मोठी घसरण झोमॅटोचा स्टॉक लिस्ट झाल्यानंतर प्रथमच 100 रुपयांच्या खाली गेला आहे. सोमवारी Zomato चा शेअर 18 टक्क्यांहून अधिक घसरला आणि तो 91.60 रुपयांवर गेला. Zomato चा स्टॉक त्याच्या सर्वोच्च पातळीपासून 44 टक्क्यांनी खाली आला आहे. शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटींचं नुकसान Nykaa कंपनीला घसरणीचा फटका लिस्टिंगनंतर जोरदार चर्चेत आलेल्या Nykaa च्या स्टॉकमध्येही मोठी घसरण होताना दिसत आहे. Nyaka चा शेअर 14 टक्क्यांच्या घसरणीसह 1725 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. Nykaa त्याच्या ऑल टाईम हायच्या जवळपास 33 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे. CarTrade शेअरमध्येही पडझड CarTrade शेअर्समध्येही मोठी घसरण होत आहे. हा स्टॉक त्याच्या ऑल टाईम हायवरून 50 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्याची IPO किंमत प्रति शेअर 1618 रुपये होती, परंतु Cartrade सोमवारी 4.20 टक्क्यांनी कमी होऊन 778 रुपयांवर व्यवहार करत आहे. Paytm, Zomato शेअर्समध्ये मोठी घसरण, लिस्टिंगनंतरच्या नीच्चांकी पातळीवर, काय आहे कारण? झोमॅटो आणि पॉलिसीबाझार सारख्या नवीन-युगातील टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये भारत आणि परदेशात बाँड यील्डच्या वाढीमुळे विक्री होत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कमी बाँड यील्डमुळे या कंपन्यांचे मूल्यांकन त्यांच्या फंडामेंटलपेक्षा खूप जास्त होते. मात्र, आता बाँड यील्ड वाढल्याने मोठ्या गुंतवणूकदारांनी या कंपन्यांमधून आपले पैसे काढण्यास सुरुवात केली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Paytm, Share market, Zomato

    पुढील बातम्या