मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Akshaya Tritiya 2021:अक्षय्य तृतीयेला गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी, काय आणि कसा होईल फायदा?

Akshaya Tritiya 2021:अक्षय्य तृतीयेला गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी, काय आणि कसा होईल फायदा?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या वर्षासाठी कोणतेही सॉव्हेरियन गोल्ड बाँड्स (Sovereign Gold Bond) जाहीर केलेले नाहीत. मात्र, रिटेल गुंतवणुकदार (Retail Investors) डिमॅट अकाउंटचा वापर करून सोन्याचे बॉन्ड विकत घेऊ शकतात.

नवी दिल्ली 11 मे: अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) हा हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण असतो. या दिवसाला पौराणिक महत्त्व आहे. धर्मशास्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं (Gold) खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे घराला लक्ष्मीमातेचा आशिर्वाद आणि कृपा लाभते आणि समृद्धी घरात राहते अशीही लोकांची श्रद्धा आहे. या वर्षी लॉकडाउनमुळे सोनं खरेदी करणं शक्य नाही, तर तुम्ही स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून सोन्याचे बॉन्ड विकत घेऊ शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या वर्षासाठी कोणतेही सॉव्हेरियन गोल्ड बॉन्ड्स (Sovereign Gold Bond) जाहीर केलेले नाहीत. मात्र, रिटेल गुंतवणुकदार (Retail Investors) डिमॅट अकाउंटचा वापर करून सोन्याचे बॉन्ड विकत घेऊ शकतात.

बिड ऑफर स्प्रेड कमी

सॉव्हेरियन गोल्ड बॉन्डचा एक कूपन रेट असतो. तो बॉन्ड मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर निश्चत केलेला असतो. आरबीआयने आतापर्यंत 49 वेळा सॉव्हेरियन गोल्ड बॉन्ड लाँच केले असून दरवेळी सरासरी 1.25 टन सोनं डिजिटल किंवा पेपर फॉर्ममध्ये लाँच केलं आहे. यापैकी 19 बाँडचा दररोजचा ट्रेडिंग व्हॉल्युम 100 युनिटपेक्षा अधिक आहे. अनेक सॉव्हेरियन गोल्ड बॉन्डमध्ये लिक्विडिटी कमी असल्याने तुम्हाला ते मार्केट प्राइजला खरेदी करणं अवघड जाईल. तुम्हाला त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागेल. या ऑफरच्या प्रकाराला बिड ऑफर स्प्रेड म्हणतात. ही जेवढी कमी स्प्रेड होईल तेवढा तुमचा फायदा होईल.

बाँड खरेदी करताना यील्ड टू मॅच्युरिटी महत्त्वाची

तुम्ही जर सेकंडरी मार्केटमध्ये बॉन्ड खरेदी करत असाल तर यील्ड टू मॅच्युरिटी सर्वांत महत्त्वाची असते. कारण मॅच्युरिटीपर्यंत बॉन्ड ठेवला तर तुम्हाला किती फायदा होणार हे त्यातून कळतं. पण सॉव्हेरियन गोल्ड बॉन्डसाठी यील्ड टू मॅच्युरिटी महत्त्वाची नसते आणि तुम्ही त्या बॉन्डची मार्केट प्राइजची इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवरच्या 999 प्युअरिटी गोल्डच्या कोल्जिंग रेटशी तुलना करू शकता. सर्व ब्रोकर एक्सचेंजच्या माध्यमातून तुम्ही सॉव्हेरियन गोल्ड बॉन्ड विकत घेऊ शकता.

एसजीबीमध्ये गुंतवणूक केली तर कसे मिळतील रिटर्न

दोन वर्ष तेजीत असलेल्या सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत. तसं पाहाता अजूनही सोन्यात तेजी आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या सर्वोच्च भावाच्या तुलनेत सोनं अजूनही 10 ग्रॅममागे 9 हजार रुपयांनी कमीच आहे. क्वांटम एएमसीचे सीनिअर फंड मॅनेजर चिराग मेहता म्हणाले,‘या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतींवर बाजाराचा दबाव आहे. अमेरिकेत लवकर अर्थव्यवस्था रिकव्हर होईल या आशेवर असलेल्या अमेरिकी बाँड यील्ड आणि डॉलरच्या किमतीमुळे हा दबाव निर्माण झाला आहे.

गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. कोरोना वाढल्यामुळे गुंतवणुकदार इक्विटीत पैसे गुंतवणं कमी करू शकतात, त्याचा फायदा सोन्याला मिळू शकतो. त्यामुळे पुन्हा सोन्याच्या किमती वधारू शकतात. सोन्याच्या किमती वाढल्या तर नक्कीच सॉव्हेरियन गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीला चांगला रिटर्न मिळेल त्यामुळे त्याबद्दल विचार करायला हवा.

First published:

Tags: Gold, Gold bond, Sovereign gold bond scheme