6 महिन्यांसाठी विसरा शेअर बाजार आणि FD, इथे पैसे गुंतवलेत तर मिळेल बंपर नफा

6 महिन्यांसाठी विसरा शेअर बाजार आणि FD, इथे पैसे गुंतवलेत तर मिळेल बंपर नफा

शेअर बाजार आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवून फारसा काही फायदा झाला नाही. तिथे गुंतवलेले पैसे वाढण्याच्या ऐवजी कमीच झाले. त्यामुळे आर्थिक सल्लागार सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देत आहेत. त्यांच्या मते, सध्याच्या स्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करून 20 ते 25 टक्के फायदा मिळवला जाऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : 2019 हे वर्ष सोन्यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी चांगलं होतं. मागच्या 8 महिन्यांत सोन्यामधल्या गुंतवणुकीने 25 टक्के फायदा मिळवून दिला आहे. त्याचबरोबर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 40 टक्के फायदा झाला आहे.

शेअर बाजार आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवून फारसा काही फायदा झाला नाही. तिथे गुंतवलेले पैसे वाढण्याच्या ऐवजी कमीच झाले. त्यामुळे आर्थिक सल्लागार सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देत आहेत. त्यांच्या मते, सध्याच्या स्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करून 20 ते 25 टक्के फायदा मिळवला जाऊ शकतो.

शेअर्स आणि म्युच्युअल फंड फायद्याचं का नाही ?

एस्कॉर्ट सिक्युरिटीचे आसिफ इक्बाल म्हणतात, जागतिक स्तरावर देशांमधले संघर्ष आणि आर्थिक वाढीबद्दलच्या चिंतेमुळे जगाला ग्रासलं असेल तर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधतात. आत्ता सोन्यामध्ये पैसे गुंतवणं लोकांना सुरक्षित वाटतं आहे.

ते सांगतात, 2008 च्या मंदीमध्ये सोन्यामधल्या गुंतवणुकीने 42 टक्के फायदा मिळवून दिला होता. त्याचवेळी भारतीय शेअर बाजारातला निर्देशांक खूपच खालावला होता.

केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांच्या मते, सोन्याच्या किंमतींमधली तेजी काही दिवस तरी कायम राहणार आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 41 हजार रुपये प्रतितोळा इतके होऊ शकतात, असाही त्यांचा अंदाज आहे. त्यामुळेच सोन्यामधली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

का वाढले सोन्याचे भाव ?

1. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकच्या अहवालात जागतिक स्तरावर आर्थिक वाढ खुंटल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे लोक सोन्यामधल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहेत.

2. रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी वाढवली आहे. जगभरातल्या देशांच्या केंद्रीय बँका पुढच्या काही महिन्यांत 374 मेट्रिक टन सोन्याची खरेदी करतील, असा अंदाज आहे. RBI ने मार्च 2018 पासून आतापर्यंत 60 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली.

SBI डेबिट कार्ड रद्द करण्याच्या तयारीत, असे काढता येणार पैसे

3. अमेरिकेने गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे. जेव्हाजेव्हा अमेरिका व्याजदरात कपात करते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात, असा ट्रेंड आहे. आत्ताही तसंच चित्र पाहायला मिळालं.

4. अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धाचा जगालाच फटका बसला आहे. जागतिक स्तरावर व्यापार मंदावला असल्यामुळे आशियाई देशातलं चलन कमकुवत झालं आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली.

5. अमेरिका आणि इराणमध्येही तणाव निर्माण झालाय. अशा स्थितीत लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत.

===================================================================================================

राज ठाकरे ईडी चौकशीसाठी घराबाहेर पडतानाचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या