मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँक ऑफ बडोदामध्ये एका वर्षासाठी गुंतवा 342 रुपये, होईल 4 लाखांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या Details

बँक ऑफ बडोदामध्ये एका वर्षासाठी गुंतवा 342 रुपये, होईल 4 लाखांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या Details

बँक ऑफ बडोदामध्ये एका वर्षासाठी तुम्हाला 342 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे महिन्यासाठी 28 रुपये जमा करावे लागतील.

बँक ऑफ बडोदामध्ये एका वर्षासाठी तुम्हाला 342 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे महिन्यासाठी 28 रुपये जमा करावे लागतील.

बँक ऑफ बडोदामध्ये एका वर्षासाठी तुम्हाला 342 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे महिन्यासाठी 28 रुपये जमा करावे लागतील.

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर: गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या काळात लाखो जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक कुटुंबांतल्या कर्त्या व्यक्ती गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब निराधार झाल्याचीदेखील उदाहरणं आपल्या समोर आहेत. तसंच काही जणांना तर उपचारांसाठीच इतका खर्च आला, की त्यांच्यावर डोक्यावर कर्जाचा भार पडला आहे. अशा परिस्थितीमध्ये विम्याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. आपल्या आयुष्यात येणारी संकटं कुठलीही पूर्वकल्पना देऊन येत नाहीत. त्यामुळे आपण कायम तयारीत असणं केव्हाही चांगलंच. विविध बँकांच्या साहाय्यानं केंद्र सरकार नागरिकांना विमा सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. 'झी न्यूज'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

देशातल्या सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशा दोन विमा योजना केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अशी या दोन योजनांची नावं आहेत. या दोन्ही विमा योजनांमध्ये मिळून व्यक्तीला 4 लाख रुपयांपर्यंतचं संरक्षण मिळतं. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत (PMSBY)विविध लाभ मिळतात. एखाद्या अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा त्याला पूर्णपणे अपंगत्व आलं, तर 2 लाख रुपयांची भरपाई मिळते. याशिवाय विमाधारकाला कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आलं, तर त्याला 1 लाख रुपयांचं विमा संरक्षण (Insurance Cover) मिळतं. 18 ते 70 वयोगटातली कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेचा वार्षिक हप्ता अतिशय कमी आहे. वर्षाकाठी फक्त 12 रुपये हप्ता भरून नागरिक विमा संरक्षण मिळवू शकतात.

हेही वाचा- या बँकेत अकाउंट असल्यास होईल मोठा फायदा, दर महिन्याला 28 रुपये जमा करुन मिळेल 4 लाखांचा बेनिफिट

 पंतप्रधान जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) नावाची आणखी एक योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला 2 लाख रुपये मिळतात. त्यासाठी 330 रुपये इतका वार्षिक हप्ता आहे. 18 ते 50 वयोगटातली कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. या दोन्ही विमा योजनांचा कालावधी एका वर्षाचा आहे. एका वर्षानंतर पुन्हा त्यांचं नूतनीकरण करावं लागतं.

केंद्र सरकारच्या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर बँक ऑफ बडोदामध्ये एका वर्षासाठी तुम्हाला 342 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे महिन्यासाठी 28 रुपये जमा करावे लागतील. असं केल्यास विपरीत परिस्थितीत 4 लाख रुपयांची मदत मिळेल.

हेही वाचा- मोठी बातमी! सरकारकडून Retrospective Tax मागे; Cairn, Vodafone सारख्या कंपन्यांना होणार फायदा

देशातली सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्येदेखील (SBI) शासकीय विमा योजनांची सुविधा उपलब्ध आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून या दोन योजनांची माहिती दिली आहे. 'तुमच्या गरजेनुसार विमा घ्या आणि चिंतामुक्त जीवन जगा. तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट सुविधेद्वारे हप्ता कापला जाईल. व्यक्तीच्या एकाच बचत बँक खात्यावर ही योजना मिळेल,' अशी माहिती या ट्विटच्या माध्यमातून एसबीआयनं दिली आहे.

या दोन्ही विमा योजना अतिशय माफक दरांमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मिळणारी रक्कमदेखील जास्त आहे. त्यामुळे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) हे चांगले पर्याय आहेत.

First published:

Tags: Investment, Money, बँक