Home /News /money /

2021 मध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत, या 5 क्षेत्रातील शेअर्स देतील चांगला रिटर्न

2021 मध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत, या 5 क्षेत्रातील शेअर्स देतील चांगला रिटर्न

यावर्षी आयटी आणि फार्मा सेक्टरने (IT and Pharma Sector) सर्वांना मागे टाकलं आहे. आयटी क्षेत्रातील स्टॉक्सनी 57 टक्के तर फार्म स्टॉक्सनी 61 टक्के रिटर्न दिला आहे. जाणून घ्या पुढील वर्षात तुम्ही कोणत्या क्षेत्रात पैसे गुंतवले तर ते फायद्याचं ठरू शकेल.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 01 जानेवारी: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आलेल्या आर्थिक संकटानंतर अर्थव्यवस्था आता हळूहळू सावरू लागली आहे. त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रिकव्हरीचे संकेत देखील पाहायला मिळत आहेत. 2021 मध्ये रिकव्हरीबाबत सकारात्मक आउटलुक आणि सरकार द्वारे योजनांवर अधिक खर्च केला जात असल्याने जाणकारांच्या मते इंडस्ट्रियल सेक्टरप्रमाणेच कंझम्पशन सेक्टर देखील चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. दरम्यान जोपर्यंत कोरोना व्हॅक्सिन (Corona Vaccine) येत नाही तोपर्यंत संक्रमणाची दुसरी लाट येण्याची रिस्क कायम राहील. जाणकारांच्या मते 2021 मध्ये आर्थिक व्यवहार उंचावतील आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे खुलेल, यामुळे विकासासाठी नव्या वाटा दिसू लागतील. इनव्हेस्टमेंट फर्म असणाऱ्या अॅक्सिस सिक्योरिटीजचे नीरज चंदावार यांनी मनीकंट्रोलला अशी माहिती दिली की, कोरोना व्हॅक्सीनचा सर्व सेक्टरवर परिणाम होईल. अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्यामुळे आर्थिक वृद्धी अधिक वेगाने होईल. शिवाय कॉर्पोरेट्सची देखील चांगली कमाई होईल. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, सरकारने अधिक खर्च केल्यामुळे आणि टॅक्सच्या दरात कपातीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे इक्विटी मार्केटला सपोर्ट मिळेल. (हे वाचा-आधार अपडेट करायचं असेल तर आता घरबसल्या बुक करा अपॉइंटमेंट, वाचा सविस्तर) 2020 मध्ये आयटी आणि फार्मा सेक्टरमधील शेअर्स वधारले कोरोना काळात वर्क फ्रॉम होम कल्चर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा फायदा शेअर बाजारात आयटी क्षेत्राला झाला. तसंच पँडेमिक काळात नागरिकांनी आरोग्याला अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केल्याने फॉर्मा स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. यावर्षी आयटी आणि फार्मा सेक्टरने (IT and Pharma Sector) सर्वांना मागे टाकलं आहे. आयटी क्षेत्रातील स्टॉक्सनी 57 टक्के तर फार्म स्टॉक्सनी 61 टक्के रिटर्न दिला आहे. तर ऑटो, कॅपिटल गूड्स, कंझ्यूमर स्टॉक्स, एनर्जी, एफएमसीजी, मेटल स्टॉक्समध्ये 8 ते 10 टक्के वाढ पाहायला मिळाली. 2021 मध्ये या स्टॉक्समध्ये तेजीची आशा यावर्षी 2020 मध्ये बँक, ऑइल अँड गॅस आणि PSUs च्या स्टॉक्समध्ये निराशा पाहायला मिळाली. ही क्षेत्री वगळता मार्चमधील नीचांकी पातळीनंतर बाकी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र बँक, ऑइल अँड गॅस आणि PSUs स्टॉक वर्ष संपताना नेगिटिव्ह राहले आहेत. या क्षेत्रांनी गुंतवणूकदारांना नेगिटिव्ह रिटर्न दिला आहे. मात्र 2021 मध्ये भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचे संकेत असल्याने बँक, NBFCs, इन्फ्रास्ट्रक्चर, आयटी आणि मेटल सेक्टरचे समभाग चांगलं प्रदर्श करतील आणि इतर क्षेत्रांना मागे टाकतील. (हे वाचा-नवीन वर्ष नवीन वेबसाइट! IRCTC वर आता काही सेकंदात बुक होणार रेल्वे तिकिट) बँकेचे स्टॉक्सही वधारणार Narnolia Financial Advisors चे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर शेलेंद्र कुमार यांनी Moneycontrol ला अशी माहिती दिली आहे की,  2021 मध्ये देखील डिजिटल ट्रान्सफर्मेशन जारी राहिल. ज्यामुळे  IT स्टॉक्समध्ये आणखी तेजी येईल. तर NPA बाबत अनिश्चतता संपल्यामुळे बँकांचे स्टॉक्स देखील मोठ्या प्रमाणात वधारतील. रियल इस्टेट, इंफ्रा आणि मेटल मध्ये गुंतवू शकता पैसे श्रीराम लाइन इन्शूरन्सचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर अजीत बॅनर्जी यांनी Moneycontrol ला दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, 2021 मध्ये  बँकिंग, एनर्जी, इंडस्ट्रियल आणि कंझ्यूमर प्रोडक्ट्सचे स्टॉक्स चांगलं प्रदर्शन करतील. त्यांनी असे म्हटले की, सरकार द्वारे अधिक खर्च केला जात असल्यामुळे डिफेन्सिव्ह स्टॉक्सच्या तुलनेत सायक्लिकल स्टॉक्स चांगले प्रदर्शन करतील.  Ashika Group चे  मुख्य रणनीतिकार अमित जैन यांनी देखील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की,  इंफ्रास्ट्रक्चर, मेटल आणि काही PSUs यामध्ये गुंतवणुकदारांना चांगला रिटर्न मिळेल. त्यांनी गुंतवणुकदारांना 2021  मध्ये IT आणि Pharma स्टॉक्सऐवजी रियल इस्टेट, इंफ्रा आणि मेटल मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Share market

    पुढील बातम्या