• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • या बँकांमध्ये FD करून मिळवा SBI-HDFC पेक्षा जास्त रिटर्न, मिळेल 7 टक्क्यांपर्यंत व्याज

या बँकांमध्ये FD करून मिळवा SBI-HDFC पेक्षा जास्त रिटर्न, मिळेल 7 टक्क्यांपर्यंत व्याज

मुदत ठेव अर्थात एफडी ठेवण्यासाठी योग्य बँक (Bank) निवडणं महत्त्वाचं असतं. बँक निवडण्यातील मुख्य निकष हा व्याजदर असतो. जी बँक सर्वाधिक व्याज दर (Highest Interest rate) देते त्या बँकेत पैसे ठेवण्याला गुंतवणूकदार प्राधान्य देतात.

  • Share this:
नवी दिल्ली, 13 जुलै: कमी जोखीम असलेली गुंतवणूक म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदार बँकेत मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit-FD) ठेवण्याला प्राधान्य देतात. यामुळे त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासही मदत होते. मुदत ठेव अर्थात एफडी ठेवण्यासाठी योग्य बँक (Bank) निवडणं महत्त्वाचं असतं. बँक निवडण्यातील मुख्य निकष हा व्याजदर असतो. जी बँक सर्वाधिक व्याज दर (Highest Interest rate) देते त्या बँकेत पैसे ठेवण्याला गुंतवणूकदार प्राधान्य देतात. सध्या मात्र व्याजदरात घसरण होत असल्याचं दिसत आहे. बँक बझारच्या (Bank Bazar) आकडेवारीनुसार, मोठ्या आणि प्रस्थापित बँकांच्या तुलनेत नवीन आणि लहान खासगी बँका जास्त व्याज दर देत आहेत. त्यातही एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यासारख्या छोट्या फायनान्स बँका मुदत ठेवींवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहेत. तर डीसीबी बँकेसारख्या बँका 6.75 टक्के दरानं व्याज देत आहेत. आरबीएल बँक 6.25 टक्के आणि बंधन बँक 6 टक्के दरानं व्याज देत आहे. एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) अशा खासगी बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेसारख्या बँकांच्या तुलनेत हे व्याज दर जास्त आहेत. हे वाचा-Gold: मंगळवारी सोन्याचांदीला झळाली, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) 2.70 टक्के व्याज देते तर बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) 3.20 टक्के दरानं व्याज देते. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) 4 टक्के दरानं व्याज देते. एकंदरीत खासगी आणि लहान बँका सरकारी आणि खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांपेक्षा 2 ते 3 टक्के अधिक व्याजदर देत आहेत. मात्र खातेदारांसाठी छोट्या खासगी बँकांमध्ये खाते उघडण्यात एक तोटा असतो. तो म्हणजे या बँकामध्ये खात्यातील किमान शिल्लक (Minimum Balance) ठेवावी लागणारी रक्कम ही मोठ्या बँकांपेक्षा जास्त असते. मोठ्या बँकेत किमान शिल्लक रक्कम कमीतकमी 500 रुपये असू शकते; परंतु एयू स्मॉल फायनान्स बँकेसाठी हीच रक्कम 2 हजार रुपये असू शकते. त्यामुळं तज्ज्ञांचे असं म्हणणं आहे की, मध्यमवर्गीय पगारदार आणि व्यावसायिक हा मोठा ग्राहकवर्ग असल्यानं लहान बँका ही रक्कम अधिक ठेवतात. त्यामुळं बँकेत खातं उघडताना चांगल्या सेवेचा इतिहास असलेली आणि विस्तृत नेटवर्क असलेली बँक निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
First published: