Home /News /money /

पोस्ट ऑफिसच्या FD स्कीममध्ये मिळवा बँकेपेक्षा जास्त व्याज, गुंतवणुकीचे इतरही फायदे समजून घ्या

पोस्ट ऑफिसच्या FD स्कीममध्ये मिळवा बँकेपेक्षा जास्त व्याज, गुंतवणुकीचे इतरही फायदे समजून घ्या

Post Office FD Scheme: बँका मुदत ठेवींचा पर्याय देखील देतात, परंतु त्यांचे व्याजदर अनेकदा कमी असतात. त्याचबरोबर ग्राहकांना पोस्ट ऑफिस एफडीवर अधिक परतावा मिळतो तसेच सरकारची सुरक्षा हमीही मिळते.

    मुंबई, 15 मे : भारतीय पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध योजना घेऊन येत असते. देशात मोठा मध्यमवर्ग आहे, त्यामुळे आजही त्यांना मार्केट रिस्क स्कीमवर गुंतवणूक (Share Market Investment Risk) करायला आवडत नाही. तुम्ही बाजारातील जोखमीपासून दूर गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत (Post Office Fixed Deposit Scheme) गुंतवणूक करू शकता. बँका मुदत ठेवींचा पर्याय देखील देतात, परंतु त्यांचे व्याजदर अनेकदा कमी असतात. त्याचबरोबर ग्राहकांना पोस्ट ऑफिस एफडीवर अधिक परतावा मिळतो तसेच सरकारची सुरक्षा हमीही मिळते. तुम्हीही पोस्ट ऑफिस एफडी योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेची घ्या. LIC चे स्वस्तात शेअर खरेदीची संधी, कसं? तज्ज्ञांकडून समजून घ्या पोस्ट ऑफिस वेब साईटवरील माहितीनुसार पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. यामध्ये तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांपर्यंत FD करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला 7 दिवसांपासून ते 1 वर्षाच्या कालावधीच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, तुम्हाला 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के व्याजदर मिळतो. 3 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के व्याजदर आणि 3 ते 5 वर्षांच्या FD वर 6.70 टक्के व्याजदर मिळेल. पोस्ट ऑफिस एफडीचे फायदे >> या योजनेतील गुंतवणूक बाजारातील जोखमीपासून मुक्त आहे. >> तुम्हाला नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांसारख्या ऑनलाइन व्यवहारांची सुविधा मिळते. >> या योजनेतून रोखीचे व्यवहार करता येतात. >> 5 वर्षांच्या FD योजनेतील गुंतवणूक आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळण्यास पात्र आहे. Cibil स्कोअर जितका चांगला तितकी कर्ज मिळण्याची शक्यता वाढते; लगेच चेक करा तुमचा सिबिल स्कोअर पोस्ट ऑफिस एफडी कसे उघडायचे? पोस्ट ऑफिसमध्ये एफडी उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता. एफडी उघडण्यासाठी तुम्हाला किमान 1000 गुंतवावे लागतील. तुम्ही FD मध्ये फक्त 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Fixed Deposit, Investment, Money, Post office

    पुढील बातम्या