मराठी बातम्या /बातम्या /मनी /क्या बात है! इथे गुंतवणूक कराल तर 87 दिवसांत पैसे होतील दुप्पट; 10.2 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज

क्या बात है! इथे गुंतवणूक कराल तर 87 दिवसांत पैसे होतील दुप्पट; 10.2 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज

मुथूट फिनकॉर्पच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी 26 ऑक्टोबरपर्यंत आहे.

मुथूट फिनकॉर्पच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी 26 ऑक्टोबरपर्यंत आहे.

मुथूट फिनकॉर्पच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी 26 ऑक्टोबरपर्यंत आहे.

  कशामध्ये गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न्स (Returns) मिळतील याचा शोध गुंतवणूकदार (Investor) सातत्यानं घेत असतात. काही गुंतवणूकदार सोने, शेअर्स, आयपीओ यांमध्ये, तर काही म्युचअल फंड, एफडी यांसारख्या पर्यायांचा विचार करताना दिसतात. तुम्ही अशा कोणत्या पर्यायाचा गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर मुथूट फिनकॉर्पनं (Muthoot Fincorp) गुंतवणुकीची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. मुथूट फिनकॉर्पने एनसीडी (Muthoot Fincorp NCD) अर्थात नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचरची घोषणा केली आहे. या माध्यमातून मुथूट फिनकॉर्प 400 कोटी रुपये उभारणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना ही चांगली संधी म्हणता येईल. याविषयीचं वृत्त `झी बिझनेस हिंदी`ने दिलं आहे.

  मुथूट फिनकॉर्पच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी 26 ऑक्टोबरपर्यंत आहे. सिक्योर्ड (Secured) आणि अनसिक्योर्ड (Unsecured) एनसीडीनुसार यात गुंतवणुकीचे 10 वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याचा मॅच्युरिटी (Maturity) कालावधी 27 महिने ते 87 महिन्यांपर्यंत आहे. एनसीडीतल्या विविध पर्यायांमध्ये गुंतवणुकीवर 10.2 टक्के व्याज मिळेल. मुथूट फिनकॉर्पच्या एनसीडीला CRISIL कडून A+/Stable असं रेटिंग मिळालं आहे. कंपनीचं रेटिंग चांगलं असल्यानं हा एनसीडी पूर्णतः सुरक्षित मानला जात आहे. या एनसीडीत कोणत्याही एफडी किंवा रिकरिंग डिपॉझिटच्या तुलनेत व्याज 4 टक्के आधिक आहे.

  हे वाचा - Gold Price: सोन्याचे दर 269 रुपये तर चांदी 630 रुपयांनी वधारली,तपासा लेटेस्ट भाव

  नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर म्हणजे नेमकं काय? तर नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर हे एक आर्थिक साधन असतं. ते कंपनीकडून जारी करण्यात येतं. त्याद्वारे कंपनी गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करते. यासाठी पब्लिक इश्यूदेखील (Public Issue) घोषित केला जातो. यात गुंतवणूक करणाऱ्यांना एका ठराविक दरानं व्याज दिलं जातं. एनसीडीचा कालावधी निश्चित असतो. मॅच्युरिटीवेळी गुंतवणूकदारांना मूळ रकमेसह व्याजाची (Interest) रक्कम दिली जाते. बॅंक एफडीप्रमाणे हे डेट इन्स्ट्रुमेंट (Debt Instrument) आहे.

  सिक्योर्ड एनसीडी म्हणजे यात कंपनीची सिक्युरिटी असते. कंपनीनं काही कारणांनी गुंतवणूकदारांना पैसे परत केले नाहीत तर गुंतवणूकदार त्याचे असेट्स विक्री करून आपले पैसे मोकळे करू शकतात. अनसिक्योर्ड एनसीडीमध्ये कंपनीची सिक्युरिटी नसते. त्यामुळे त्यात जोखीम जास्त असते.

  मुथूट फिनकॉर्पच्या एनसीडीची बेस साइज (Base Size) 200 कोटी रुपयांची आहे. ग्रीन इश्यू पर्यायाच्या माध्यमातून ही कंपनी आणखी 200 कोटी रुपये उभारू शकते. याचाच अर्थ एनसीडीच्या माध्यमातून एकूण 400 कोटी रुपयांपर्यंत रक्कम उभारण्याचा पर्याय कंपनीसमोर आहे. कंपनी सिक्योर्ड आणि अनसिक्योर्ड डेटच्या माध्यमातून हे पैसे उभारणार आहे.

  मुथूट फिनकॉर्पच्या एनसीडीत 27,38, 60, 72 आणि 87 महिन्यांच्या मॅच्युरिटी पीरियडच्या विविध योजनांचा समावेश आहे. यासाठी व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. यात गुंतवणूकदार दरमहा किंवा एकदम व्याज मिळवण्यासाठी पर्याय निवडू शकतात. 87 महिन्यांची मॅच्युरिटी असलेल्या एनसीडीचा व्याजदर 10.2 टक्के आहे. याचाच अर्थ 87 महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याची संधी कंपनी गुंतवणूकदारांना देत आहे. अन्य पर्यायांमध्ये 8.25, 8.50, 8.75,9.50 आणि 9.75 टक्के असा व्याजदर असेल.

  हे वाचा - HDFC बँक देतंय Festive Treats! लोन आणि EMI सह मिळतील 10000 पेक्षा जास्त ऑफर

  एका एनसीडी इश्यूची किंमत 1000 रुपये आहे. गुंतवणुकदारांना किमान 10 एनसीडीमध्ये म्हणजेच 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यानंतर गुंतवणूकदार 1च्या पटीत पैसे गुंतवू शकतात. याचं लिस्टिंग बीएसईवर (BSE) होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीकरिता हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  First published:
  top videos

   Tags: Money, Savings and investments