नवी दिल्ली, 30 जुलै : कमी भांडवलात जास्त नफा मिळेल (Earn Money) असे अनेक व्यवसाय (Business) आपल्या देशात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स (Dairy Products) चा व्यवसाय आहे. डेअरी प्रॉडक्ट्सचा वापर हा दररोज केला जात असल्याने या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता नगण्य आहे. केवळ 5 लाख रुपये गुंतवणूक (Investment) करून प्रत्येक महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न या व्यवसायातून मिळू शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारदेखील आता मदत करीत आहे. आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर प्रथम तसे नियोजन करा. हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करता येऊ शकतो (Start New Business), हे जाणून घेऊयात.
मुद्रा लोन (PMMY) योजनेअंतर्गत मिळेल कर्ज
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम भांडवलाची गरज असते. तुमच्याकडे जर व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसेल, तरी चिंता करण्याचं कारण नाही. कारण केंद्र सरकारच्या पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत भांडवलाची सहज व्यवस्था केली जाऊ शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार भांडवलासोबतच व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती देते, जेणेकरून आपण व्यवसाय आरामात सुरू करू शकता.
एकूण गुंतवणीच्या 70 टक्के मिळेल कर्ज
डेअरी प्रॉडक्ट्स (Dairy Products) चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलापैकी 70 टक्के रक्कम ही मुद्रा लोन योजनेअंतर्गत बँकेतून मिळेल.
पाच लाख रुपये स्वतःची गुंतवणूक
डेअरी प्रॉडक्ट्स या व्यवसायाच्या प्रोजेक्ट प्रोफाइलप्रमाणे 16 लाख 50 हजार रुपयांपर्यंत प्रकल्प उभारणीला खर्च येऊ शकतो. यापैकी फक्त 5 लाख रुपयांची गुंतवणूक ही स्वतः ला करावी लागणार आहे.
आणखी एका सहकारी बँकेचा परवाना RBI ने केला रद्द, ठेवीदांराच्या रकमेवर काय होणार परिणाम?
असा आहे प्रोजेक्ट
पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रोजेक्टनुसार या व्यवसायात एका वर्षात 75 हजार लिटर दुधाची विक्री होऊ शकते. याशिवाय 36 हजार लिटर दही, 90 हजार लिटर लोणी आणि 4500 किलो तूपही बनवून विकता येते. हे सर्व पाहता सुमारे 82 लाख 50 हजार रुपयांची या व्यवसायात उलाढाल होईल. ज्यात सुमारे 74 लाख रुपये खर्च येईल. उर्वरित रक्कमेतून 14 टक्के व्याजाचे पैसे बाजूला काढले तरीही जवळपास 8 लाखांचे उत्पन्न मिळते.
एक हजार स्केअर फूट जागा आवश्यक
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक हजार स्केअर फूट जागेची आवश्यकता आहे. यामधील 500 स्केअर फूट जागा ही दूध प्रक्रिया (Milk processing) प्रकल्पासाठी लागेल. तर, रेफ्रिजरेशन रूमसाठी 150 स्केअर फूट, वॉशिंग क्षेत्रासाठी 150 स्केअर फूट, कार्यालयासाठी 100 स्केअर फूट, तर उर्वरित जागेत शौचालय व इतर सुविधा करता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.