सरकारच्या या स्कीममध्ये 200 रुपये गुंतवून मिळवा 35 लाख रुपये

सरकारच्या या स्कीममध्ये 200 रुपये गुंतवून मिळवा 35 लाख रुपये

Investment - तुम्हाला चांगली आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर याचा विचार करा

  • Share this:

मुंबई : रोज 50 किंवा 100 रुपये वाचवून मोठी बचत होते का? तर याचं उत्तर होय आहे. छोटी छोटी बचत करून तुम्ही चांगला फंड तयार करू शकता. फक्त तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. आज आम्ही तुम्हाला अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, जी खूपच फायदेशीर आणि सुरक्षित आहे. त्यात तुम्ही मोठी रक्कमही गुंतवू शकता.

तुम्ही तुमचे पैसे पब्लिक प्राॅव्हिंडंट फंड अकाउंटमध्ये गुंतवू शकता. PPF मध्ये रोज 200 रुपये या हिशेबानं 20 वर्षात 35 लाख रुपयांचे तुम्ही मालिक असाल.

पेट्रोल आणि डिझेल झालं पुन्हा महाग, 'हे' आहेत आजचे दर

PPF चा फायदा

हल्लीच्या काळात सुरक्षित आणि टॅक्सही वाचेल अशी गुंतवणूक म्हणजे PPF. यात तुम्ही वर्षाला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता.

Loading...

PPF ची खासीयत अशी की तुम्हाला दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळू शकतं. अर्थात, हे सर्व क्रेडिट मॅच्युरिटीनंतरच होतं. दर महिन्याचं व्याज पूर्ण मिळावं यासाठी तुम्ही जर दर महिन्याला पैसे भरत असाल तर ते 5 तारखेच्या आत भरावं.

जुनं बँक अकाउंट बंद करताय? मग ही काळजी घ्यायलाच हवी

PPFमध्ये 5 तारखेच्या आत पैसे भरले तर आधीची रक्कम आणि नंतर टाकलेली रक्कम या दोन्हीवर व्याज मिळतं. त्याचा फायदा तुम्हाला होतो.

जर तुम्ही PPF अकाऊंटमध्ये वर्षातून एकदाच पैसे टाकत असाल तर तेही 5 एप्रिलच्या अगोदर भरा. म्हणजे वर्षाचं पूर्ण व्याज मिळू शकतं.

SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आता झीरो बॅलन्स अकाउंटचे मिळतील 'हे' फायदे

कसा मिळणार 35 लाखाचा फंड?

या स्कीममध्ये तुम्ही फक्त 200 रुपये रोज गुंतवा. महिन्याला तुमचे 6 हजार रुपये होतील. पीपीएफमध्ये 7.9 टक्के वर्षाला व्याज मिळेल. 20 वर्षांनी तुम्हाला रिटर्न 35 लाख 16 हजार 21 रुपये मिळतील.

VIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: PPF
First Published: Sep 21, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...