मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mutual Fund: ‘हा’ मिडकॅप फंड लाँग टर्म गुंतवणूकदारांना करेल मालामाल; समजून घ्या डिटेल्स

Mutual Fund: ‘हा’ मिडकॅप फंड लाँग टर्म गुंतवणूकदारांना करेल मालामाल; समजून घ्या डिटेल्स

Mutual Fund: ‘हा’ मिडकॅप फंड लाँग टर्म गुंतवणूकदारांना करेल मालामाल; समजून घ्या डिटेल्स

Mutual Fund: ‘हा’ मिडकॅप फंड लाँग टर्म गुंतवणूकदारांना करेल मालामाल; समजून घ्या डिटेल्स

Invesco Mid Cap Fund IMCF: अल्पावधीत साधारण कामगिरी असूनही ICMF ने दीर्घ मुदतीत उत्कृष्ट परतावा दिला आहे. उदाहरणार्थ, 10 वर्षांच्या परताव्याच्या आधारावर, ICMF ने 18 टक्के CAGR दराने परतावा दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 2 ऑक्टोबर: मार्च 2022 पासून आत्तापर्यंत इन्वेस्को मिड कॅप फंडचं प्रदर्शन जास्त चांगलं राहिलं नाही. परंतु आयएमसीएफनं लाँग टर्ममध्ये मात्र दमदार कामगिरी केली आहे. फंड मॅनेजर प्रणव गोखले यांनी पोर्टफोलियो सुधारण्यासाठी काही ठोस पावलं उचलली आहेत.

ICMFने आपल्या फंडातील कमीत कमी 65 टक्के मिडकॅप शेअर्समध्ये लावला आहे. बाकी फंड लार्ज आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवला आहे. ही स्कीम जास्त रिस्क घेण्यासाठी तयार असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अनुकूल जास्त रिस्क आणि जास्त रिटर्नवाली इन्व्हेस्टर्स स्टॅटर्जीचं पालन करतात. प्रणव गोखले मार्च 2018 पासून स्कीमचं प्रबंधन करत आहेत.

10 वर्षात दिले एवढे रिटर्न-

शॉर्ट टर्ममध्ये सरासरी कामगिरीनंतरही लाँग टर्ममध्ये आयसीएमएफनं दमदार रिटर्न दिले आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर 10 वर्षांच्या परताव्याच्या आधारावर पाहायचं झालं तर आयसीएमएफनं 18 टक्के सीएजीआर दरातून परतावा दिला आहे. तर  S&P BSE 150 Midcap-TRI मध्ये 15 टक्के परतावा राहिला आहे. आयसीएमएफनं गेल्या तीन वर्षांत 22.4 टक्के, पाच वर्षात 14.5 टक्के सीएजीआर दरानं परतावा दिला आहे.

फंड मॅनेजर गोखले यांनी सांगितलं की, आपण अशा मिडकॅप्समध्ये गुंतवणूक करतो, ज्यामध्ये लार्जकॅप बनण्याची शक्यता असते. आपण वाढीवर केंद्रित कंपन्यांवर डाव लावतो, ज्यांचा रिटर्न रेशियो आणि कॅश फ्लो योग्य असेल.

स्टॉक्सची संख्या वाढवली-

फंड मॅनेजर स्कीमला योग्य मार्गावर आणण्याकरिता काम करत आहेत. गोखले यांनी सांगितलं की, होल्डिंग्जची संख्येत वाढीच्या माध्यमातून आम्ही पोर्टफोलियाला योग्यरित्या विभागलं आणि त्याला वाढीसाठी योग्य बनवलं. त्यांनी स्टॉक्सची संख्या वाढवून 55 केली आहे, जी गतवर्षी 42 होती. तुलनात्मक दृष्टीकोनातून पाहिल्यास मिडकॅप कॅटेगरीमध्ये छोटे कॉर्प्सपासून फंड मॅनेजरसाठी मिड आणि स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये सक्रिय पोझिशन घेणं शक्य झालं आहे.

हेही वाचा: मृत्यूनंतर PAN, आधार अन् मतदार ओळखपत्राचं काय करायचं? ते कसं वापरलं जाऊ शकतं?

सहा महिन्यात खरेदी केले नवे 21 स्टॉक्स-

गेल्या महिन्यात आयएमसीएफने बँक ऑफ बडोदा, अब्बोट्ट इंडिया, वेदांत फॅशन्स, इंडियन हॉटेल्स कंपनी आणि टिव्हीएस मोटर्स कंपनीसहीत 21 स्टॉक्स आपल्या पोर्टफोलियोत जोडले आहेत. प्रवण यांना ऑटो एंसिलरीज, रिटेल, कंज्यूमर डिस्क्रेशनरी, इंडस्ट्रियल कंस्ट्रक्शन आणि फायनॅन्शियल्स सेक्टर पसंत आहेत.  आयसीएमएफने मिडकॅप स्टॉक्सशिवाय, लार्जकॅप स्टॉक्स आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये चांगली गुंतवणूक केली आहे. जास्त धोका पत्करण्याची क्षमता असलेले गुंतवणूकदार आयएमसीएफला पाच वर्षांपेक्षा जास्त अवधिसाठी आपल्या पोर्टफोलियोमध्ये समाविष्ट करू शकतात.

First published:

Tags: Investment, Mutual Funds