Elec-widget

व्याजदर कमी झाले तरी 'या' योजनेत अजूनही दुप्पट होतात तुमचे पैसे

व्याजदर कमी झाले तरी 'या' योजनेत अजूनही दुप्पट होतात तुमचे पैसे

Kisan Vikas Patra - तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे व्याजदर कमी झाले असले तरी ते किती महिन्यांनी दुप्पट होणार ते पाहा

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : किसान विकास पत्र (KISAN VIKAS PATRA )मध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल तर ही मोठी बातमी आहे. सरकारनं छोट्या बचत योजनेत समावेश असलेल्या किसान विकास पत्र ( KVP )वर मिळणारा व्याज दर कमी केलाय. त्यामुळे यात पैसे दुप्पट होण्यालाही आता थोडा जास्त वेळ लागणार आहे. KVPमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम आता 9 वर्ष 5 महिन्यांनी दुप्पट होईल. आधी हा अवधी 9 वर्ष 4 महिने होता. व्याज दर घटल्यामुळे केव्हीपीच्या मॅच्युरिटीचा काळ एक महिन्यांनी वाढवलाय.

पैसे दुप्पट व्हायला 1 महिना जास्त

अर्थ मंत्रालयानं किसान विकास पत्र नियम 2014मध्ये सुधारणा केली. त्यांनी सांगितलं की 1 जुलै 2019पासून KVP मध्ये ठेवलेली रक्कम 9 वर्ष 5 महिने म्हणजेच 113 महिन्यांनी दुप्पट होईल. आतापर्यंत ही रक्कम 9 वर्ष 4 वर्षांनी म्हणजे 112 महिन्यांनी दुप्पट व्हायची.

देशाची नंबर 1 कंपनी झाली रिलायन्स इंडस्ट्री, 'ही' आहे फाॅर्च्युन ग्लोबलची लिस्ट

किसान विकास पत्राचा व्याज दर कमी झालाय. तो आता 7.6 टक्के केलाय. एप्रिल-जूनमध्ये तो 7.7 टक्के होता. सरकार नेहमीच छोट्या बचतींच्या व्याजदरात बदल करत असते.

Loading...

कमी गुंतवणुकीत जास्त फायदा, रोज कमवा 4 हजार रुपये

अशी करू शकता गुंतवणूक

कोणीही व्यक्ती KVP मध्ये 1000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकते. KVP 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांच्या मूल्यात मिळतं. किसान विकास पत्र पोस्ट ऑफिसमध्ये मिळतात.

मॉब लिंचिंग आणि 'जय श्रीराम' याबदद्ल 49 सेलिब्रेटींचं मोदींना पत्र

कधी पैसे काढता येतात?

KVP सर्टिफिकेट घेतल्यानंतर अडीच वर्षांनी पैसे काढता येतात. समजा तुम्ही 1000 रुपयांचं किसान विकास पत्र घेतलं असेल तर तुम्हाला 1,173 रुपये मिळतील. हेच जर 3 वर्षांनी काढले तर 1,211 रुपये मिळतील. साडेतीन वर्षानंतर 1,251 रुपये हातात येतील. आणि 9 वर्ष 5 महिन्यांनी KVPमध्ये गुंतवले तर दुप्पट होतील.

VIDEO: धक्कादायक! डोंगराला पडल्या भेगा, 143 कुटुंबांचं काय होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2019 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...