• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Investment: आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणुकीचे जबरदस्त पर्याय, 251 टक्क्यांनी मिळाला परतावा

Investment: आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणुकीचे जबरदस्त पर्याय, 251 टक्क्यांनी मिळाला परतावा

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणुकीचे पर्याय, 5 वर्षांत मिळाला तब्बल 251 % परतावा (प्रातिनिधिक फोटो)

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणुकीचे पर्याय, 5 वर्षांत मिळाला तब्बल 251 % परतावा (प्रातिनिधिक फोटो)

Investment in Mutual Funds: या आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडांच्या गेल्या 5 वर्षांतल्या कामगिरीचा आढावा घेतला, तर या फंडांनी जबरदस्त परतावा (Returns) दिल्याचं लक्षात येते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : आपल्या देशात (India) शेअर बाजारातल्या (share Market) गुंतवणुकीबाबत अनेक गैरसमज आहेत, धास्ती आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने फार कमी जण शेअर बाजारात गुंतवणूक करतात. त्यातही सावध गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाणही मोठं असल्यानं बहुतांश गुंतवणूकदार आपल्या देशातल्या शेअर बाजारापुरतीच गुंतवणूक मर्यादित ठेवतात; मात्र काही गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार असतात. त्यांना गुंतवणुकीच्या नवनव्या संधींची अपेक्षा असते. त्यांच्यासाठी जागतिक शेअर बाजाराची (Global Share Market) द्वारंही खुली आहेत. त्यामुळे थेट ग्लोबल इक्विटीमध्ये (Global Equity) गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जागतिक शेअर बाजारातल्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी देणारे काही म्युच्युअल फंड (Mutual Fund) बाजारात उपलब्ध आहेत. त्याद्वारे जागतिक बाजारातल्या शेअर्समध्ये येणाऱ्या तेजीचा लाभ घेणं शक्य आहे. 'झी बिझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (Global Mutual Fund) विविध जागतिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता (Diversified Portfolio) येते. शेअर्सव्यतिरिक्त रिअल इस्टेट, कमोडिटीज, मायनिंगसारख्या क्षेत्रांतही ते गुंतवणूक करतात. त्यामुळे नफ्याचं प्रमाण अधिक असतं. या आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडांच्या गेल्या 5 वर्षांतल्या कामगिरीचा आढावा घेतला, तर या फंडांनी जबरदस्त परतावा (Returns) दिल्याचं लक्षात येते. या आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडांनी 1 लाखाच्या गुंतवणुकीचं पाच वर्षांत 3.51 लाख केले आहेत. म्हणजेच 5 वर्षात तब्बल 251 टक्के परतावा दिला आहे. यावरून आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं किती लाभदायी आहे, हे स्पष्ट होतं. अशा काही फंडांची कामगिरी जाणून घेऊ या... वाचा : 5 रुपयांचा हा स्टॉक पोहोचला ₹42 वर, 6 महिन्यात गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले ₹8.39 लाख Nippon India US Equity Opportunities Fund 5 वर्षांचा परतावा : 21.55 टक्के सीएजीआर 5 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचं मूल्य : 2.65 लाख रुपये एसआयपीद्वारे दरमहा 5000 रुपये याप्रमाणे 5 वर्षांतल्या गुंतवणुकीचं मूल्य : 5.4 लाख किमान गुंतवणूक : 100 रुपये किमान एसआयपी : 100 रुपये फंड दाखल झाल्याची तारीख : 23 जुलै 2015 फंड दाखल झाल्यापासून परतावा : 17.82 टक्के मालमत्ता : 514 कोटी (30 सप्टेंबर, 2021) खर्चाचं प्रमाण : 0.71 टक्के (30 सप्टेंबर, 2021) ICICI Prudential US Bluechip Equity Fund 5 वर्षांचा परतावा : 21 टक्के सीएजीआर 5 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचं मूल्य : 2.59 लाख रुपये एसआयपीद्वारे दरमहा 5000 रुपये याप्रमाणे 5 वर्षांतल्या गुंतवणुकीचं मूल्य : 5.25 लाख रुपये किमान गुंतवणूक : 5000 किमान एसआयपी : 100 रुपये फंड दाखल झाल्याची तारीख : 1 जानेवारी 2013 फंड दाखल झाल्यापासून परतावा : 18.85 टक्के मालमत्ता : 1799 कोटी (30 सप्टेंबर, 2021) खर्चाचं प्रमाण : 1.14 टक्के (30 सप्टेंबर, 2021) वाचा : यंदा दिवाळीत अवघ्या 1 रुपयात खरेदी करा Digital Gold; जाणून घ्या ही सोपी पद्धत Motilal Oswal NASDAQ 100 ETF 5 वर्षांतील परतावा : 29 टक्के सीएजीआर 5 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचं मूल्य : 3.51 लाख रुपये दरमहा 5000 रुपये याप्रमाणे 5 वर्षांतल्या गुंतवणुकीचं मूल्य : 6.5 लाख किमान गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये फंड दाखल झाल्याची तारीख : 29 मार्च2011 दाखल झाल्यापासून परतावा : 25 टक्के मालमत्ता : 5152 कोटी (30 सप्टेंबर 2021) खर्चाचं प्रमाण : 0.56 टक्के (30 सप्टेंबर 2021) PGIM India Global Equity Opportunities Fund 5 वर्षांचा रिटर्न : 26 टक्के सीएजीआर 5 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचं मूल्य : 3.16 लाख रुपये एसआयपीद्वारे दरमहा 5000 रुपये याप्रमाणे 5 वर्षांतल्या गुंतवणुकीचं मूल्य : 6.5 लाख किमान गुंतवणूक : 5000 किमान एसआयपी : 1000 प्रक्षेपण तारीख : 1 जानेवारी 2013 फंड दाखल झाल्यापासून परतावा : 13.15 टक्के मालमत्ता : 1518 कोटी (30 सप्टेंबर 2021) खर्चाचं प्रमाण : 1.40 टक्के (30 सप्टेंबर, 2021)
  First published: