नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 30 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. नागरी उड्डयन महासंचालकांनी (Directorate General of Civil Aviation) भारतातून येणाऱ्या-जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय शेड्युल्ड कमर्शियल पॅसेंजर विमानांच्या फ्लाईट्सवरील बॅन आणखी एका महिन्यासाठी वाढवला आहे. यापूर्वी हा बॅन 31 ऑगस्ट रोजी संपणार होता.
Directorate General of Civil Aviation ने आपल्या जून महिन्यात जारी केलेल्या परिपत्रकात सुधारणा करुन हा बॅन वाढवण्याचे आदेश जारी केले असून ही बंदी 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहील असं सांगण्यात आलं आहे. परिपत्रकानुसार, ही बंदी आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपरेशन्स आणि डीजीसीएने मंजूर केलेल्या विशेष उड्डाणंवर लागू होणार नाही.
कोरोना व्हायरसमुळे मागील वर्ष 23 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित आहे. परंतु वंदे भारत अभियान आणि एअर बबल सिस्टमअंतर्गत मे महिन्यापासून काही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं चालवण्याची परवानगी आहे.
The government extends suspension on international scheduled commercial passenger flights to and from India till 30th September pic.twitter.com/Z1fsZOMp65
— ANI (@ANI) August 29, 2021
दरम्यान, आरोग्य मंत्रालयानुसार, मागील 24 तासांत देशात कोरोना संसर्गाच्या 45 हजार 83 नव्या केसेस समोर आल्या आहेत. तर 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 3 लाख 68 हजार 558 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर 3 कोटी 18 लाख 88 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 37 हजार 830 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात 63,09,17,927 लोकांचं लसीकरण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.