खूशखबर! 12 दिवसांनी झालं डिझेल स्वस्त, पेट्रोलच्या दरातही घसरण

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या गुरुवारच्या किमती जाणून घ्या

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 11:05 AM IST

खूशखबर! 12 दिवसांनी झालं डिझेल स्वस्त, पेट्रोलच्या दरातही घसरण

मुंबई, 25 जुलै : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतायत, पण घरगुती बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट होतेय. आज गुरुवारी ( 25 जुलै ) 12 दिवसांनंतर डिझेल स्वस्त झालंय. त्याबरोबर पेट्रोलच्या किमतीतही एका दिवसानंतर घट झालीय. आज सकाळी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलमध्ये 6 पैसे प्रति लिटर घसरण झालीय. मुंबईत पेट्रोल 6 पैसे तर डिझेल 7 पैशांनी स्वस्त झालंय.

मध्य पूर्वेत असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वद्धी पाहायला मिळाली. आखाती देशातल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती जास्त वाढल्या. त्यामुळे लवकरच या किमती वाढू शकतात.

1999 रुपयांत विमान प्रवास, इंडिगोच्या 'या' आहेत नव्या ऑफर्स

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 73.35 रुपये, 75.85 रुपये, 78.96 रुपये और 76.19 रुपये प्रति लीटर आहेत. चार महानगरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: 66.18 रुपये, 68.29 रुपये, 69.37 रुपये आणि 69.91 रुपये प्रति लीटर आहेत.

सोनं पुन्हा एकदा कडाडलं, 'हे' आहेत बुधवारचे 10 ग्रॅमचे दर

Loading...

असे पाहा पेट्रोलचे दर

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीत मोठी भरती, 'असा' करा अर्ज

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

VIDEO: शिवसेना प्रवेशाची चर्चा छगन भुजबळांनी फेटाळली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Jul 25, 2019 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...