लग्नसराईच्या दिवसांत सोनं -चांदीच्या दरात वाढ, हे आहेत आजचे दर

लग्नसराईच्या दिवसांत सोनं -चांदीच्या दरात वाढ, हे आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्याने देशातही सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 328 रुपयांनी वाढले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्याने देशातही सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 328 रुपयांनी वाढले आहेत. त्याचवेळी चांदीच्या दरातही मोठी वाढ झालीय. चांदीचे भाव 748 रुपयांनी वाढले. सोन्याचे दर आत्ता वाढले असले तरी या दरात पुन्हा घसरण होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 39 हजार 28 रुपये प्रतितोळा झाले. चांदीच्या दरातही वाढ झाली असून हे दर 45 हजार 873 प्रतिकिलो झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत. HDFC सिक्युरटीजच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर 1 हजार 470 प्रतिऔंस झाले तर चांदी 17.10 डॉलर प्रतिऔंस झाली.

1 जानेवारी 2020 पासून सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे नियम बदलणार आहेत. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सोनं आणि चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं करण्याला हिरवा कंदिल दिला आहे. हे सक्तीचं हॉलमार्किंग 1 जानेवारीपासून लागू होईल. याच आठवड्यात मंत्रालय याबदद्लचं पत्रक जारी करेल.

भारतात सोन्याची आयात

सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना फायदा होईल. सध्या 40 टक्के दागिन्यांवर हॉलमार्किंग केलं जातं. भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणावर आयात होते. दरवर्षी 700 ते 800 टन सोनं आयात केलं जातं.

==========================================================================================

First published: November 19, 2019, 4:54 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading