मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्या EPFO खात्यात लवकरच व्याजाचे पैसे जमा होणार; घरबसल्या चेक करा स्टेटस

तुमच्या EPFO खात्यात लवकरच व्याजाचे पैसे जमा होणार; घरबसल्या चेक करा स्टेटस

सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर आता लवकरच खातेदारांच्या खात्यात पीएफते व्याज ट्रान्सफर करण्याची तयारी सुरू झाली आहे. तुमचं व्याज तुमच्या खात्या आलं की नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकाल.

मुंबई, 12 जून : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सुमारे 5 कोटी सदस्यांना 2022 या आर्थिक वर्षासाठीचं व्याज लवकरच मिळणार आहे. भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज कमी करुन 8.1 टक्के देण्यास सरकारने अलीकडेच मंजूर केले आहे. गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे.

सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर आता लवकरच खातेदारांच्या खात्यात पीएफते व्याज ट्रान्सफर करण्याची तयारी सुरू झाली आहे. तुमचं व्याज तुमच्या खात्या आलं की नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकाल.

Umang अॅप

>> स्मार्टफोन यूजर्स Umang या अॅपद्वारे त्यांचे पीएफ शिल्लक देखील तपासू शकतात.

>> यासाठी तुम्हाला उमंग अॅप ओपन करुन ईपीएफओवर क्लिक करावे लागेल.

>> यामध्ये Employee Centric Services वर क्लिक केल्यानंतर View Passbook वर जा आणि UAN आणि पासवर्ड टाका.

>> त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.

>> OTP एंटर केल्यानंतर आपण शिल्लक पाहू शकता.

गृहकर्जाचे व्याजदर वाढल्याने घरखर्चाचं बजेट कोलमडलं? EMI कमी करण्यासाठी काय करु शकता?

वेबसाइटवरून

>> पीएफ शिल्लक स्थिती ऑनलाइन तपासण्यासाठी, ईपीएफ पासबुक पोर्टलवर जावं लागेल.

>> येथे तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल.

>> यामध्ये, पासबुक डाउनलोड / पहा वर क्लिक करा.

>> यानंतर पासबुक तुमच्या समोर उघडेल. यामध्ये तुम्ही शिल्लक स्थिती पाहू शकता.

Bank of Baroda E-Auction: स्वस्त घर खरेदीची संधी, 'या' दिवशी लिलावात सहभागी व्हा

SMS च्या मदतीने

ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून EPFO ​​UAN LAN (भाषा) 7738299899 वर पाठवावे लागेल. LAN म्हणजे भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. हिंदीत माहितीसाठी तमिळसाठी HIN आणि TAM लिहून एसएमएस पाठवावा लागेल. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल.

मिस्ड कॉलद्वारे

मिस्ड कॉलच्या (Missed Called) मदतीने तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक देखील तपासू शकता. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागेल.

First published:

Tags: Epfo news, Money, Pf, PF Amount