मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खूशखबर! सणासुदीच्या काळात घरखरेदी झाली स्वस्त, या बँका देत आहेत 15 वर्षातील सर्वात कमी व्याजदर

खूशखबर! सणासुदीच्या काळात घरखरेदी झाली स्वस्त, या बँका देत आहेत 15 वर्षातील सर्वात कमी व्याजदर

ऐन दिवाळीच्या तोंडावरच देशातील बड्या बँकांनी आपल्या गृहकर्जांच्या व्याजदरांत घसघशीत घट केली आहे. त्यामुळे मागील 15 वर्षांत पहिल्यांदाच होमलोन एवढं स्वस्त झालं आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावरच देशातील बड्या बँकांनी आपल्या गृहकर्जांच्या व्याजदरांत घसघशीत घट केली आहे. त्यामुळे मागील 15 वर्षांत पहिल्यांदाच होमलोन एवढं स्वस्त झालं आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावरच देशातील बड्या बँकांनी आपल्या गृहकर्जांच्या व्याजदरांत घसघशीत घट केली आहे. त्यामुळे मागील 15 वर्षांत पहिल्यांदाच होमलोन एवढं स्वस्त झालं आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: स्वत:चं हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. यंदा सणासुदीच्या दिवसांत तुम्हाला घराचं स्वप्न साकार करता येणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच देशातील बड्या बँकांनी आपल्या गृहकर्जांच्या व्याजदरांत घसघशीत घट केली आहे. त्यामुळे मागील 15 वर्षांत पहिल्यांदाच होमलोन एवढं स्वस्त झालं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांनी व्याजदरांत कपात केली आहे.

व्याजदर कपात करून कर्ज स्वस्त करण्यासोबतच बँकांनी कर्जदारांना आणखीही काही अतिरिक्त लाभ देऊ केले आहेत. प्रोसेसिंग शुल्कात सवलत, महिला कर्जदारांना विशेष सवलतही काही बँकांकडून दिली जाणार आहे. मागील 15 वर्षांत पहिल्यांदाच होमलोनचे व्याजदर एवढे नीचांकी गेल्याचं अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सचे (ANAROCK Property Consultants) व्हाईस चेअरमन संतोष कुमार यांनी म्हटलं आहे.

हे आहेत काही प्रमुख बँकांचे व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)

स्टेट बँकेने 30 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी  6.09 टक्के एवढा व्याजदर ठेवला आहे. ३० लाखांवरील कर्जाच्या रकमेसाठी 7 टक्के एवढा व्याजदर आकारला जाणार आहे. 75 लाखांहून अधिक किमतीचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची सवलत दिली जाईल. अर्थात कर्जदाराचा CIBIL स्कोअर पाहून ही सवलत देण्यात येणार आहे.

(हे वाचा-कोट्यवधी कर्जदारांना मिळणार दिलासा? 5 नोव्हेंबरला SC मध्ये पुढील सुनावणी)

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

या बँकेने घरांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवर 15 बेसिस पॉइंटची कपात करत असल्याची घोषणा केली आहे. बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांवर 6.85 टक्के एवढा व्याजदर आकारला जाणार आहे.

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)

बँकेच्या होमलोनचा व्याजदर 6.9 टक्क्यांपासून सुरू होत आहे. इतर बँकांच्या कर्जदारांनी आपलं खातं कोटक महिंद्रा बँकेकडे वळतं केल्यास त्यांना फायदा होणार असल्याचं बँकेनी म्हटलं आहे. जवळपास 20 लाख रुपयांची त्यांची बचत होईल, असं बँकेचे म्हणणं आहे. कोटक महिंद्रा बँकेने महिला कर्जदारांसाठी विशेष सवलत देऊ केली आहे.

(हे वाचा-बायकोचं ATM कार्ड वापरताय तर आधीच व्हा सावधान! वाचा काय आहे नियम)

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)

बँकेचे होमलोनचं व्याजदर 7 टक्क्यांपासून सुरू होत आहेत. 30लाखांवर कर्ज असल्यास बँकेने 10 बेसिस पॉइंट्सने व्याज कमी करण्याचं ठरवलं आहे. महिला कर्जदारांसाठी विशेष सलवत योजनाही राबवली जात आहे. त्यानुसार महिलांना व्याजदरात 5 बेसिस पॉइंटची सवलत मिळेल. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार 31 डिसेंबरपर्यंत कुठलीही प्रोसेसिंग फीदेखील लागणार नाही.

इतर बँकांमध्ये अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँकांचेही होमलोनचे दर 6.9 टक्क्यांपासून सुरू होत आहेत.

First published:

Tags: SBI, Sbi home loan