Home /News /money /

नवीन वर्षात नोकरदारांसाठी खूशखबर! EPF वर 8.5 टक्के दराने मिळेल व्याज

नवीन वर्षात नोकरदारांसाठी खूशखबर! EPF वर 8.5 टक्के दराने मिळेल व्याज

केंद्रीय मंत्री अशोक गंगवार यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सर्व ईपीएफ धारकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत असे म्हटले आहे की, ईपीएफ वरील व्याज वाढवण्याचं जे आश्वासन मार्च 2020 मध्ये दिलं होतं ते निर्धारित वेळेत पूर्ण केलं जातं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 01 जानेवारी: केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांनी सर्व पीएफधारक कर्मचार्‍यांना (EPF Employees) नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) यांनी ईपीएफवरील व्याज दर वाढविण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सध्या जमा ईपीएफवर (EPF) 8.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. आतापर्यंत कर्मचार्‍यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15 टक्के व्याज मिळत होते. केंद्रीय मंत्री गंगवार यांनी आज 31 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सर्व ईपीएफ धारकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की मार्च 2020 मध्ये ईपीएफवरील व्याज वाढवण्याचे वचन दिले होते. जे आता निर्धारित वेळेत पूर्ण होत आहे. गंगवार म्हणाले की 2020 मधील परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल नव्हती. वर्षाच्या सुरूवातीला जेव्हा भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात आला होता, तेव्हा आम्ही 2019-20 साठी व्याज 8 5 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यावर आम्ही पूर्ण सक्रियतेवर लक्ष केंद्रित केले आहे आणि आज मी हे वचन दृढपणे पूर्ण करीत आहे. (हे वाचा: सरकारबरोबर व्यवसाय करण्याच्या विचारात आहात? याठिकाणी करा नोंदणी, वाचा योजनेबद्दल) अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत करून आम्ही या प्रस्तावासाठी मान्यता मिळवली आहे. ही वेगळी बाब आहे की या व्याजदराच्या अंमलबजावणीची तारीख 31 मार्च 2020 होती, जी 31 डिसेंबर 2020 करण्यात आली. आता आम्ही या निश्चित मुदतीत त्या निर्णयाचे पालन करण्यास सक्षम आहोत. 2019-20 या आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधीवर 8.5 टक्के दराने व्याज देण्याची अधिसूचना जारी केली आहे. आजपासून सर्व सहा कोटी ग्राहकांना हा व्याज दर मिळू लागला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal

    पुढील बातम्या