Home /News /money /

Insurance Claim: युद्धामुळे मृत्यू झाल्यास करता येतो इन्शुरन्स क्लेम, जाणून घ्या अधिक माहिती

Insurance Claim: युद्धामुळे मृत्यू झाल्यास करता येतो इन्शुरन्स क्लेम, जाणून घ्या अधिक माहिती

रशिया-युक्रेन संघर्षातून इन्शुरन्स क्लेम होतील की नाही आणि त्याबाबत आयआरडीएआय काय निर्णय घेईल हे येणाऱ्या काळात समजेल. परंतु, या ठिकाणी काही कॉमन क्लेम सिनॅरिओसंबंधीत प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 11 मार्च : रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध (Russia-Ukraine War) सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनमध्ये (Ukraine) तणावाची स्थिती असून त्याठिकाणी असणारे हजारो भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत तर काहीजण अद्यापही तिथेच आहेत. आतापर्यंत युक्रेनमध्ये दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, युद्ध परिस्थितीमध्ये मृत्यू झाल्यास इन्शुरन्स क्लेम(Insurance Claim) करता येतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत विमा कंपन्यांनी (Insurance Companies) स्पष्टीकरण दिलं आहे. भारतातील विम्या कंपन्यांना आतापर्यंत अशा क्लेमचा सामना करावा लागलेला नाही. त्यांच्याकडे भूतकाळातील अशा प्रकारच्या घटनांचा संदर्भही नाही. मात्र, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर विमा कंपन्यांनी युद्धामुळे मृत्यू (War Death) झालेल्या ग्राहकांचा इन्शुरन्स क्लेम स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. पण, विद्यार्थी प्रवास विमा (Student Travel Insurance) आणि इतर सामान्य विमा संरक्षणांसाठी ही गोष्ट लागू होणार नाही. लाइफ इन्शुरन्स कंपन्या (Life Insurance Companies) जे कव्हर ऑफर करतात जे एखाद्या व्यक्तीच्या जगण्याच्या संभाव्यतेशी जोडलेले असतात. परंतु, सामान्य विमा कंपन्या मालमत्ता, वाहन, मौल्यवान वस्तू, आगीच्या घटना, हेल्थ इन्सिडन्ट्स, प्रवासादरम्यान होणारं नुकसान, वैयक्तिक अपघातांमुळे येणारा मृत्यू किंवा अपंगत्व, सायबर अॅक्टिव्हिटी यासारख्या विविध बाबींसाठी इन्शुरन्स देतात. युद्धासारख्या परिस्थितीमध्ये काही जीवित किंवा वित्तहानी झाल्यानंतर काय करावं? यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मनीकंट्रोलनं विमा तज्ज्ञांशी (Insurance Experts) संवाद साधला आहे. बजाज अलियान्झ लाईफचे (Bajaj Allianz Life) एमडी आणि सीईओ, तरुण चौघ (Tarun Chugh) म्हणतात, 'युद्धाच्या परिस्थितीत आमच्या इंडस्ट्रीद्वारे ऑफर केलेले सर्व लाईफ कव्हर सुरू राहतात. इन्शुरन्स कव्हरमधून युद्ध वगळण्यासाठी कोणताही क्लॉज नाही. अशा मानवनिर्मित संकटांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamities) क्लेम येतीलच याबाबत आम्हाला पूर्वकल्पना असतेच. असे क्लेम प्राधान्यानं निवडण्याचा आणि पॉलिसीधारकाच्या (Policyholder) कुटुंबातील सदस्यांना आवश्यक ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो.' या घटना कव्हर केल्या जात नाहीत विमा करारामध्ये विविध घटना वगळण्याची काही कलमं नक्कीच नमूद केलेली आहेत. दहशतवाद (Terrorism), युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती या अशा घटना आहेत ज्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे भारतीय विमा कंपन्यांनी पूर, भूकंप (Earthquakes) आणि साथ रोगाच्या (Pandemic) काळात क्लेम्सची प्रक्रिया जलद केलेली आहे. खरं तर, साथीचा रोग आणि युद्ध यासारख्या घटना हे फोर्स्ड इव्हेंट्स आहेत. अशा कालावधीत येणारे क्लेम नाकारले जाऊ शकतात. पण, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं (IRDAI) सर्व विमा कंपन्यांना COVID-19च्या काळात आलेल्या क्लेम्सचा स्वीकार करण्यास सांगितलं होतं. आयआरडीएआयच्या 2020-21 मधील वार्षिक अहवालानुसार, महामारीमुळे आलेल्या 21 हजार 304 दाव्यांसाठी 1 हजार 418.71 कोटी रुपये दिले गेले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षातून इन्शुरन्स क्लेम होतील की नाही आणि त्याबाबत आयआरडीएआय काय निर्णय घेईल हे येणाऱ्या काळात समजेल. परंतु, या ठिकाणी काही कॉमन क्लेम सिनॅरिओसंबंधीत प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. प्रश्न - माझ्या विशिष्ट विमा पॉलिसीमध्ये युद्धामुळे होणारा मृत्यू वगळण्यात आला आहे, असं का? उत्तर - काही पॉलिसींमध्ये युद्धाला अपवाद म्हणून सूचीबद्ध केलेलं आहे. कारण, काही विमा कंपन्यांना मोठ्या क्लेम सेटलमेंटची भीती वाटते, अशी माहिती पॉलिसीएक्स डॉट कॉमचे (PolicyX.com) संस्थापक नवल गोयल (Naval Goel) यांनी दिली. युद्धाच्या घटनांमध्ये विमा कंपन्यांना दिवाळखोरीत (Bankruptcy) ढकलण्याची क्षमता आहे. युद्धामध्ये किती मृत्यू होऊ शकतात हे निश्चित नसतं. कदाचित लाईफ इन्शुरन्स क्लेमची रक्कम करोडो रुपयेही होऊ शकते. म्हणून काही कंपन्या युद्धामुळे झालेल्या मृत्युंना कव्हर करत नाहीत. परंतु, सर्वच इन्शुरन्स कंपन्या असं करत नाहीत. काही कंपन्या केवळ आत्महत्या केल्यानंतरचे क्लेम नाकारतात, असंही गोयल यांनी सांगितलं. प्रश्न - युद्धकाळात तणावामुळे माझ्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला होता. अशा परिस्थितीमध्ये लाईफ इन्शुरन्स बेनिफिट्ससाठी क्लेम करता येऊ शकतो का? उत्तर - होय, कोरोनरी समस्यांसारख्या (Coronary Issues) नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास इन्शुरन्स क्लेम करता येतो. विमा कंपन्या विमाधारक व्यक्तीच्या वैद्यकीय आणि इतर रिपोर्ट्सचं मूल्यांकन करतात आणि मृत्युचं कारणदेखील पाहतात. मृत्यूचं कारण जर हृदयविकाराचा झटका (Heart Attack), असं नमूद केलेलं असेल तर क्लेम द्यावाचं लागतो. परंतु, जर मृत्युच्या कारणामध्ये युद्धाचा उल्लेख केलेला असेल आणि कंपनीच्या क्लॉजमध्ये युद्धाचा समावेश नसेल तर क्लेम मान्य होत नाही, असं दिल्लीस्थित एलिजेन्स फायनान्शिअल (Allegiance Financial) या फायनान्शिअल अॅडव्हायजरीचे संचालक अजय सहगल यांनी सांगितलं. प्रश्न - मी एक अनिवासी भारतीय (Non-resident Indian) आहे आणि व्यावसायिक कारणास्तव युक्रेनमध्ये स्थायिक झालो आहे. मी भारतात असताना इन्शुरन्स कव्हर खरेदी केलं होतं. अशा प्रकारचं लाईफ इन्शुरन्स कव्हर व्हॅलिड असेल का? उत्तर - भारतात खरेदी केलेला लाईफ इन्शुरन्स जागतिक स्तरावर कुठेही मृत्यू झाला तरी वैध आहे. जोपर्यंत पॉलिसी अस्तित्त्वात आहे आणि प्रीमियम (Premium) भरलेला आहे तोपर्यंत रेसिडेन्सी स्टेटसचा (Residency Status) तुमच्या पॉलिसीवर काहीही परिणाम होत नाही. जगात कुठेही मृत्यू झाला तरीही विमा कंपन्यांनी दिलेलं लाईफ कव्हर व्हॅलिड आहे. पॉलिसी होल्डरचे वारसदार क्लेम करू शकतात आणि दुसऱ्या देशात पैसे मिळवू शकतात, असं अजय सहगल यांनी स्पष्ट केलं. सामान्यपणे बहुतांश जनरल इन्शुरन्स पॉलिसींमध्ये युद्ध परिस्थितीतील मृत्युचं कव्हर दिलं जात नाही. लाईफ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये निवडक गोष्टींचं कव्हर मिळू शकतं या पॉलिसीमध्ये युद्धाशी संबंधित सगळ्याच घटनांवर कव्हर देण्यास बंदी नसते. त्यामुळे काही घटनांबाबत इन्शुरन्स कव्हर मिळू शकतं. प्रश्न - माझ्या विम्यासोबत अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास प्रीमियम माफीचे अॅड-ऑन कव्हर आहे. युद्धाच्या परिस्थितीमध्ये मी क्लेमसाठी पात्र असेन का? उत्तर - नाही, कारण ही अॅड-ऑन कव्हर्स आहेत आणि सामान्यतः विमा रक्कम सामान्य विम्याच्या दुप्पट असल्यामुळे ते युद्धामुळे अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास वैध ठरत नाहीत. 'आमच्या पॉलिसींनुसार, भारतात विमा उतरवलेल्या ग्राहकांनी जर युक्रेनमधून क्लेम केले तर लाईफ इन्शुरन्स रकमेच्या मर्यादेपर्यंतची रक्कम त्यांना दिली जाईल. पण, पॉलिसी खरेदीच्या वेळी निवडलेले अॅड-ऑन कव्हर्स (Add-on Covers) युद्धाच्या अपवादात्मक परिस्थितीत व्हॅलिड ठरणार नाहीत, अशी माहिती एका आयुर्विमा अधिकाऱ्यानं (Life Insurance Official) नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. प्रश्न - माझ्या मुलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी मी सध्या युक्रेनमध्ये आहे. माझ्याकडे जीवन विमा पॉलिसी आहे जी मी बँक खातं उघडताना खरेदी केली होती. हे एक ग्रुप पॉलिसी कव्हर आहे. कीवमध्ये मला काही झालं तर ते वैध असेल का? उत्तर - 'अशा जीवन विमा पॉलिसी शक्यतो बँकेनं जारी केलेल्या ग्रुप पॉलिसी असतात. ही पॉलिसी कस्टमाईज्ड (Customised) असल्यानं, तुम्ही मास्टर पॉलिसी डॉक्युमेंट्स तपासले पाहिजेत. जर त्यात युद्ध किंवा युद्धासारखी परिस्थिती अपवाद म्हणून नमूद केली नसेल, तर तुमचा दावा वैध ठरू शकेल' असं नवल गोयल यांनी सांगितलं. प्रश्न - रशियाची स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसचे (State Space Agency Roscosmos) प्रमुख दिमित्री रोगोझिन (Dmitry Rogozin) यांनी म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (International Space Station) मोठा भाग भारत आणि चीनवर पडू शकतो. ही कल्पना जितकी दुर्मिळ आणि दूरगामी वाटते तितकीच जर ती प्रत्यक्षात घडली आणि अशा अपघातात जमिनीवर असलेल्या एखाद्याचा मृत्यू झाला तर? जीवन विम्याची रक्कम मिळेल का? उत्तर - अंतराळातून जर एखादी वस्तू पृथ्वीवर कोसळली आणि भारतात राहणाऱ्या कोणाचंही त्यामुळे नुकसान झालं तर या घटनेला 'अॅक्ट ऑफ गॉड' मानलं जाईल. यामुळे मृत्यू झाला तर लाईफ इन्शुरन्ससाठी क्लेम करता येऊ शकतो. कारण, ही घटना युद्ध क्षेत्रापासून दूर घडलेली आहे, असं एका खासगी जीवन विमा कंपनीच्या अॅक्च्युअरीनं सुचवलं आहे. वरील सर्व प्रश्न कुणालाही पडू शकतात. रशिया-युक्रेनशिवाय इतर कुठल्याही युद्ध परिस्थितीसाठी ते लागू होतात. तज्ज्ञांनी दिलेल्या उत्तरांनुसार, तुमच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीतील क्लॉज तुम्ही तपासून बघू शकता. त्यामध्ये युद्धाचा अपवाद केला आहे की नाही हे माहीत असेल तर भविष्यात तुम्ही युद्ध परिस्थितीत सापडलात तर तुम्हाला क्लेम करता येऊ शकेल किंवा तुमच्या वारसांना त्याची माहिती असेल. विमा संरक्षण हे प्रचंड महत्त्वाचं आहे ज्यामुळे आपण अपंग झालो तर आपलं पुढचं आयुष्य विम्याच्या रकमेमुळे चांगलं जाऊ शकेल. तसंच जर आपण जिवंत राहिलो नाही तरीही आपल्या वारसांना मोठा आर्थिक आधार मिळेल.
First published:

Tags: Insurance, Money, Russia Ukraine

पुढील बातम्या