मराठी बातम्या /बातम्या /मनी /

GOOD NEWS: या एटीएम कार्डवर 10 लाखांचं विमा कवचही मिळणार ! जाणून घ्या नवी ऑफर

GOOD NEWS: या एटीएम कार्डवर 10 लाखांचं विमा कवचही मिळणार ! जाणून घ्या नवी ऑफर

कॅशलेस पेमेंटला चालना मिळावी यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI)ने नवनवीन ऑफर्स आणल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 10 लाखांचं विमा कवचदेखील मिळू शकतं.

    मुंबई, 27 ऑक्टोबर : अडीअडचणीच्या काळात, खिशात रोख पैसे नसताना आपल्याला एटीएम कार्ड  (ATM card)च उपयोगी पडतं. आता हेच एटीएम कार्ड वाईट वेळातही तुमची साथ देणार आहे. सणासुदीच्या काळात जनधन खातं उघडणाऱ्या ग्राहकांना नवनव्या ऑफर दिल्या जात आहेत. एटीएम कार्ड देणारी कंपनी म्हणजे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI)ने रुपे फेस्टिव्ह कार्निव्हल(Rupay Festive Carnival)ला सुरुवात केली आहे. यामध्ये कार्ड धारकांना विशेष सूट देण्यात येणार आहे. काय आहेत विशेष ऑफर्स ? ई- कॉमर्स शॉपिंगपासून ते शिक्षणापर्यंत सगळ्याच गोष्टींवर या रुपे फेस्टिव्ह कार्निव्हलमध्ये सूट मिळणार आहे. टेस्टबूक डॉटकॉमच्या टेस्ट पासवर 65% सूट बाटाच्या प्रॉडक्सवर 25% सूट सॅमसंग टीव्ही, एसी, स्मार्टफोनवर 52% सूट Myntraवर 10% सूट 10 लाखांचा मोफत विमा सर्वात महत्वाची ऑफर रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड (Rupay Select Credit Card)वर 10 लाखांचं विमा कवच देण्यात आलं आहे. त्यामुळे एका कार्डावर तुमचा 10 लाखांचा विमा कव्हर होणार आहे. परदेशात या कार्डचा वापर केल्यावर एटीएमवर 5% आणि POSवर 10% कॅशबॅक मिळतो. भारतामध्ये कॅशलेस पेमेंटला चालना मिळावी म्हणून अशाप्रकारच्या ऑफर्स ग्राहकांना देण्यात येत आहेत. सध्या कोरोनामुळे कागदी नोटांचा वापर शक्य तेवढा टाळावा, असं आवाहन सरकारकडूनही करण्यात येत आहे. आजकाल डीजिटल पेमेंट करण्यावर तरुणाईचा भर असतो. भारतात मागच्या काही वर्षात डीजिटल पेमेंट करणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. ही संख्या अजून वाढावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सणासुदीच्या काळात इ कॉमर्स कंपन्यादेखील कॅश ऑन डिलिव्हरीपेक्षा ऑनलाईन पेमेंट केल्यास जास्त सवलत देत आहेत. याचा फायदा ग्राहकांना आणि कंपन्यांनाही होतो.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: ATM

    पुढील बातम्या