मराठी बातम्या /बातम्या /मनी /

अवघ्या काही मिनिटांत मिळेल कर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

अवघ्या काही मिनिटांत मिळेल कर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

डिजिटायझेशनमुळे लोनसह अनेक आर्थिक सेवा काही मिनिटांमध्ये मिळवता येतात. त्यामुळे डिजिटल इन्स्टंट कॅश लोनचा ट्रेंड वाढत आहे.

डिजिटायझेशनमुळे लोनसह अनेक आर्थिक सेवा काही मिनिटांमध्ये मिळवता येतात. त्यामुळे डिजिटल इन्स्टंट कॅश लोनचा ट्रेंड वाढत आहे.

डिजिटायझेशनमुळे लोनसह अनेक आर्थिक सेवा काही मिनिटांमध्ये मिळवता येतात. त्यामुळे डिजिटल इन्स्टंट कॅश लोनचा ट्रेंड वाढत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: फायनॅन्शिअल प्लॅनिंग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक कुवतीनुसार फायनॅन्शिअल प्लॅनिंग करते. आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे काही लोकांना लोनचा आधार घ्यावा लागतो. मग ते मुलांचं शिक्षण असो, घर बांधणं असो किंवा गाडी खरेदी असो, अशा कितीतरी कारणांसाठी लोनची गरज पडते.

बहुतेक नोकरदार पर्सनल लोन घेऊन आपल्या मोठ्या गरजा पूर्ण करतात. पूर्वी लोन घेण्याची प्रक्रिया फार वेळखाऊ होती. मात्र, आता डिजिटायझेशनमुळे लोनसह अनेक आर्थिक सेवा काही मिनिटांमध्ये मिळवता येतात. त्यामुळे डिजिटल इन्स्टंट कॅश लोनचा ट्रेंड वाढत आहे.

डिजिटल इन्स्टंट कॅश लोन हे एक अल्पमुदतीचं कर्ज आहे. याचं स्वरुप कोणत्याही प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनसारखं आहे. तुम्ही इन्स्टंट कॅश लोनसाठी त्वरित अर्ज करू शकता आणि यासाठी कागदपत्रंदेखील कमी लागतात.

या फीचर्समुळे कर्जाच्या प्रक्रियेचा वेळ वाचतो आणि तुमच्या खात्यात लवकर व सुलभपणे पैसे क्रेडिट होतात. यासाठी लागणारी पात्रतादेखील सोपी आहे, त्यामुळे सध्या इन्स्टंट कॅश लोनला प्राधान्य दिलं जात आहे. ‘एबीपी लाइव्ह’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

डिजिटायझेशनमुळे इन्स्टंट कॅश लोनसारख्या सेवा घेणं फार सोपं झालं आहे. पण, कर्ज घेताना सावधगिरी बाळगणं आणि कर्जासाठी योग्य कंपनी निवडणं आवश्यक आहे.

पगारदार किंवा स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींनी त्वरित कर्ज मिळवण्याचा अर्ज करण्यापूर्वी व्याज दर, वितरण कालावधी, प्रक्रिया शुल्क आणि इतर संबंधित शुल्क यासारख्या काही बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही खर्चाचा अंदाज घेऊन चांगले निर्णय घेऊ शकाल आणि प्रत्येक टप्प्यावर बचत करू शकाल.

पगारदार ग्राहकांना तारणमुक्त इन्स्टंट कॅश लोन उपलब्ध आहे. लोनमधून मिळवलेल्या रकमेच्या वापरावर कोणतंही बंधन नाही. या वैशिष्ट्यांमुळे हे कर्ज अल्पकालीन उद्दिष्टं किंवा तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक व्यवहार्य पर्याय ठरतो. इन्स्टंट कॅश लोनसाठी लागणारी पात्रता, कागदपत्रं आणि त्यासाठी अर्ज कसा करावा याबद्दल याठिकाणी माहिती दिली आहे.

इन्स्टंट कॅश लोन मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रं

वैयक्तिक कर्जाप्रमाणेच, इन्स्टंट कॅश लोनसुद्धा सर्वांसाठी उपलब्ध आहे. असं असलं तरी काही लोन देणाऱ्या कंपन्यांचे पात्रता निकष भिन्न असू शकतात. बहुतेक कंपन्या पात्रतेचे जे निकष लावतात ते पुढीलप्रमाणे आहेत:

1) लोनसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारताची नागरिक आणि रहिवासी असणं आवश्यक आहे.

2) अर्जदाराचं वय 21 ते 67 वर्षांदरम्यान असलं पाहिजे.

3) अर्जदार वास्तव्य करत असलेल्या शहरासंबंधी उत्पन्नाचे निकष पूर्ण करणारा असावा.

तुमच्यासाठी हे जाणून घेणंदेखील महत्त्वाचं आहे की, कर्ज देणाऱ्या काही कंपन्या पगारदार व्यक्तींना किंवा अगदी कमी क्रेडिट स्कोअर असूनही स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना त्वरित रोख कर्ज देतात. याबाबतचे पात्रता तपशील संबंधित कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असतात. तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असाल तर त्वरित कर्जासाठी अर्ज करू शकता.

पात्रता निकषांप्रमाणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणंही गरजेचं असतं. कर्ज देणारी कंपनी आणि अर्जाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज पडते. बहुतेक कंपन्या ओळख पडताळणी आणि अर्ज पडताळणीसाठी खालील कागदपत्रं मागतात:

1) रहिवासी पत्त्यासाठी युटिलिटी बिल, पासपोर्ट, आधार कार्ड यांची मागणी केली जाते.

2) ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यांची मागणी केली जाते.

3) उत्पन्नाचा पुरावा म्हणून सॅलरी स्लिप किंवा बँकेचं स्टेटमेंट मागितलं जातं.

पगारावर किंवा स्वयंरोजगारातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर इन्स्टंट कॅश लोनसाठी अर्ज करताना, आवश्यक कागदपत्रं तयार ठेवली पाहिजेत, जेणेकरून अर्जाची प्रक्रिया जलद होईल. अर्ज करण्यापूर्वी संबंधित कंपनीची वेबसाइट तपासणं आणि कर्जाच्या अटी व शर्तींसह सर्व तपशील समजून घेणं महत्त्वाचं आहे.

इन्स्टंट कॅश लोनसाठी अप्लाय कसं करावं?

इन्स्टंट कॅश लोनसाठी अप्लाय करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रं तयार असल्यास ऑनलाइन अर्ज करण्याचं काम काही मिनिटांत पूर्ण करता येतं. त्यानंतर कर्जाची रक्कम काही तासांत मंजूर होऊ शकते. इन्स्टंट कॅश लोनसाठी अप्लाय करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत:

1) कर्ज देणाऱ्या कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या आणि इन्स्टंट कॅश लोनचा पर्याय शोधा.

2) त्यानंतर अप्लाय ऑप्शनवर क्लिक करून आवश्यक असलेली माहिती भरा.

3) कर्जाच्या रुपात आवश्यक असलेली रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडा.

4) सबमिट ऑप्शनवर क्लिक करून अॅप्लिकेशन पूर्ण करा.

तुम्ही लोनसाठी अर्ज केल्यानंतर, कर्जाची रक्कम, अर्जाचा प्रकार आणि प्रक्रियेची वेळ यानुसार संबंधित कंपनीचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल. आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये, फायनान्स कंपन्या आता मोबाईल अॅप्लिकेशन्सची सुविधा देतात. यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळते. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, या अॅपद्वारे तुम्ही अर्ज करू शकता आणि ईएमआय पेमेंट करू शकता.

इन्स्टंट कॅश लोन देणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह या कंपनीला चांगलं यश मिळालेलं आहे. ही एक एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनी) आहे जी इन्स्टंट पर्सनल लोन देऊन लोकांच्या गरजा पूर्ण करते.

कंपनीचे ग्राहक बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन ऑफर अंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहजपणे मिळवू शकतात. त्यासाठी नाममात्र शुल्क लागते. शिवाय, व्याजदरही कमी आहेत. कर्जाची परतफेड करण्यासाठी 60 महिन्यांपर्यंतचा (पाच वर्षे) कालावधी मिळू शकतो.

First published:

Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan