मराठी बातम्या /बातम्या /मनी /

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम असलेले Westin हॉटेल आहे तरी कसं? एका दिवसासाठी साधारण किती खर्च येतो?

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम असलेले Westin हॉटेल आहे तरी कसं? एका दिवसासाठी साधारण किती खर्च येतो?

Photo Credit- marriott.com

Photo Credit- marriott.com

वेेस्टिन हॉटेल सात मजल्यांचं आहे. यामध्ये 572 रुम उपलब्ध आहे. सोबत 13 मीटिंग रुम्स आहे. हॉटेलमध्ये एका 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात अशा सर्व सुविधा मिळतात.

मुंबई, 7 जून : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election 2022) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आपली मतं फुटू नयेत यासाठी सर्वच पक्ष खबरदारी देखील घेताना दिसत आहेत. म्हणूनच आमदारांची आता हॉटेल वारी सुरु झाली आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना Trident हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पवई येथील वेस्टिन हॉटेल (Westin Hotel) मध्ये राहणार आहेत. राज्यसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे पुढील तीन दिवस (10 जून) आमदार या हॉटेलमध्ये राहतील आणि त्यानंतर थेट मतदानासाठी विधान भवनात येतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा ज्या Westin Hotel मध्ये मुक्काम आहे, ते हॉटेल कसं आहे, यावर एक नजर टाकूया.
Photo Credit- marriott.com
वेस्टिन हॉटेल हे मुंबई प्रसिद्ध 5-स्टार हॉटेलपैकी एक आहे. मुंबईत असूनही निसर्गाच्या सानिध्यात उभारलेलं हे हॉटेल आहे. हॉटेलमधून दिसणारा हिल व्ह्युव आणि समोर विस्तारलेला पवई तलाव (Powai Lake) हे हॉटेलमध्ये राहणाऱ्या कस्टमर्ससाठी खास आकर्षण आहे.
Photo Credit- marriott.com
हॉटेलचा विस्तार 15 एकरांच्या हिरवळीच्या बागा आणि वॉकवेच्या सान्निध्यात हॉटेल वेस्टिन आहे. मुंबईत असूनही त्या गदारोळात न राहता शांत निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी या हॉटेलमुळे ग्राहकांना मिळते. हे हॉटेल सात मजल्यांचं आहे. यामध्ये 572 रुम उपलब्ध आहे. सोबत 13 मीटिंग रुम्स आहे. हॉटेलमध्ये एका 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात अशा सर्व सुविधा मिळतात.
Photo Credit- marriott.com
जिभेचे चोचल पुरवणाऱ्यासाठी इंडियन फूड सोबत हॉटेलमध्ये स्वादिष्ट इटालियन आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींचा आनंद घेता येऊ शकता.
Photo Credit- marriott.com
हॉटेलमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार 10-12 प्रकारचे रुम्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिंगल, फॅमिली, कपल, प्रीमियम रुम अशी सोय आहे. यानुसार रुमच्या किमतीही ठरवण्यात आल्या आहेत. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी विविध अॅमिनिटीज येथे देण्यात आल्या आहेत. स्विमींग पूल, स्पोर्ट्स एरिया, फिटनेस सेंटर, जॉगिंग ट्रॅक, स्पा, फॅमिली-चिल्ड्रन अॅक्टिव्हिटी एरिया देखील आहे.
Photo Credit- marriott.comhotel
हॉटेलमध्ये राहण्यासाठी किती खर्च आहे? वेस्टिन 5 स्टार हॉटेल आहे म्हणजे तेथे राहण्याचा खर्चची तितकाच जास्त असणार आहे. विविध प्रकारच्या रुमसाठी वेगवेगळे दर आहेत. हॉटेलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, येथील रुमचे दर फ्लेक्सिबल म्हणजेच बदलत असतात. त्यानुसार येथे एक दिवस राहण्यासाठी साधारण 8500-13000 रुपये खर्च आहे.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या