नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी: आर्थिक मंदीमुळे जगभरातील कंपन्या नोकर कपात करत आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन सारख्या बड्या टेक कंपन्यांनंतर आता भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसनेही नोकर कपात केली आहे. इन्फोसिसने आपल्या 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने फ्रेशर्ससाठी इंटरनल फ्रेशर असेसमेंट (FA) ठेवले होते. यामध्ये जे कर्मचारी पास झाले नाहीत त्यांना काढून टाकण्यात आले. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीत सामील झालेल्या एका नवीन व्यक्तीने सांगितले, 'मी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इन्फोसिसमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि SAP ABAP स्ट्रीमसाठी ट्रेनिंग देण्यात आली होती. माझ्या टीममधील 150 लोकांनी फ्रेशर एसेसमेंट परीक्षा दिली, त्यापैकी 60 लोक पास झाले. बाकीच्या सर्वांना 2 आठवड्यांसाठी टर्मिनेट करण्यात आले होते. शेवटच्या बॅचमधील 150 फ्रेशर्सपैकी (जुलै 2022 मध्ये ऑनबोर्ड केलेले फ्रेशर्स), सुमारे 85 फ्रेशर्सना परीक्षेत अपयश आल्याने टर्मिनेट करण्यात आले होते.
LIC पॉलिसीमध्ये नॉमिनी बदलायचाय? ही आहे सोपी ट्रिक
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इन्फोसिसने आतापर्यंत अंतर्गत परीक्षेत नापास झालेल्या 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दोन आठवड्यांपूर्वी, FA नापास झालेल्या 208 फ्रेशर्सना काढूनटाकण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांत 600 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
मोबाईलमध्ये 'हे' 12 अॅप असतील तर सावधान! कोणतरी ठेवतंय तुमच्यावर नजर
नुकतेच इन्फोसिसने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 3.2 टक्क्यांनी वाढून 5,360 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी होता. त्यांचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीत 5,195 कोटी रुपये होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job