मराठी बातम्या /बातम्या /मनी /करदात्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती फॉर्म 26AS मध्ये समाविष्ट केली जाणार, CBDT चे आदेश

करदात्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती फॉर्म 26AS मध्ये समाविष्ट केली जाणार, CBDT चे आदेश

गेल्या वर्षी मे महिन्यात, सुधारित फॉर्म 26AS प्राप्तिकर विभागाने अधिसूचित केले होते. यामध्ये आर्थिक वर्षात केलेल्या उच्च-मूल्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती समाविष्ट आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात, सुधारित फॉर्म 26AS प्राप्तिकर विभागाने अधिसूचित केले होते. यामध्ये आर्थिक वर्षात केलेल्या उच्च-मूल्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती समाविष्ट आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात, सुधारित फॉर्म 26AS प्राप्तिकर विभागाने अधिसूचित केले होते. यामध्ये आर्थिक वर्षात केलेल्या उच्च-मूल्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती समाविष्ट आहे.

मुंबई, 28 ऑक्टोबर : आयकर विभागाने (Income tax Department) उच्च मूल्याच्या आर्थिक व्यवहारांच्या (High Value Financial Transaction) यादीचा विस्तार केला आहे. ही यादी करदात्यांना त्यांच्या फॉर्म 26AS मध्ये उपलब्ध होईल. ज्यामध्ये म्युच्युअल फंड खरेदी (Mutual Fund), परदेशातून मिळालेले पैसे, करदात्यांच्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये (Income Tax Return ) दिलेली माहिती समाविष्ट आहे. फॉर्म 26AS प्राप्तिकर वेबसाइटवरून करदात्यांना त्यांचा पॅन वापरून मिळू शकतो. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) आयकर कायद्याच्या कलम 285BB अंतर्गत नवीन फॉर्म 26AS मध्ये नोंदवलेल्या माहितीच्या व्याप्तीचा विस्तार करणारा आदेश जारी केला आहे.

करदात्यांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले जाईल

फॉर्म 26AS मध्ये दिलेल्या अतिरिक्त माहितीमध्ये अधिकृत डीलरद्वारे कोणत्याही व्यक्तीने परदेशातून आणलेले पैसे, कर्मचाऱ्याने घेतलेल्या कर कपातीसह पगाराचा ब्रेकअप, इतर करदात्यांच्या आयटीआरमधील माहिती, आयकर परताव्यावर व्याज, आर्थिक तपशील यांचा समावेश आहे. याशिवाय, डिपॉझिटरी किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटने नोंदवलेले ऑफ-मार्केट व्यवहार, RTA द्वारे नोंदवलेल्या म्युच्युअल फंडांच्या लाभांशाची माहिती आणि RTA द्वारे नोंदवलेले म्युच्युअल फंड खरेदी यासंबंधीची माहिती देखील फॉर्म 26AS मध्ये समाविष्ट केली जाईल.

NPS Scheme : निवृत्तीनंतरही महिन्याला 50 हजार रुपये पेंन्शन मिळवा, किती मासिक गुंतवणूक करावी लागेल?

CBDT ने आयकर महासंचालक (सिस्टम्स) यांना फॉर्म 26AS मधील वार्षिक माहिती तीन महिन्यांच्या आत नोंदणीकृत इलेक्ट्रॉनिक फाइलिंग खात्यावर अपलोड करण्याचे अधिकार दिले आहेत. 2020-21 च्या अर्थसंकल्पात IT कायद्यात नवीन कलम 285 BB जोडण्यात आले. यानुसार, फॉर्म 26AS ला 'Annual Information Statement' मध्ये रूपांतरित करण्यासाठी, त्यात TDS आणि TCS तपशीलांव्यतिरिक्त आर्थिक व्यवहार, कर भरणे यावरील सर्वसमावेशक माहिती समाविष्ट असेल.

गेल्या वर्षी मे महिन्यात, सुधारित फॉर्म 26AS प्राप्तिकर विभागाने अधिसूचित केले होते. यामध्ये आर्थिक वर्षात केलेल्या उच्च-मूल्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती समाविष्ट आहे. यामुळे आयटी रिटर्नचे ई-फायलिंग बरेच सोपे झाले आहे.

वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, पेट्रोल 120 रुपयांवर, तर डिझेल 111 रुपये; तपासा तुमच्या शहरातील भाव

सर्व आर्थिक व्यवहार फॉर्म 26AS मध्ये दिसतील

फॉर्म 26AS मधील या नवीन अहवालामुळे करदात्यांना तसेच कर अधिकाऱ्यांना करदात्यांच्या प्रोफाइलचे मूल्यांकन करण्यात मदत होईल आणि करदाते आणि कर अधिकारी यांच्यामध्ये माहिती अधिक चांगल्या प्रकारे सामायिक केली जाईल. फॉर्म 26AS मध्ये सुधारणा करून, CBDT ने गेल्या वर्षी सांगितले होते की आयकर विभागाने बचत बँक खात्यांमधून रोख ठेव किंवा पैसे काढणे, स्थावर मालमत्तेची खरेदी आणि विक्री, क्रेडिट कार्ड पेमेंट, शेअर्स, परकीय चलन, म्युच्युअल फंड खरेदी करणे आवश्यक आहे. आता, नवीन फॉर्म 26AS मध्ये आर्थिक व्यवहारांचे सर्व तपशील दाखवले जातील.

First published:

Tags: Income tax, Investment, Money