मराठी बातम्या /बातम्या /मनी /

भाकरी महागणार! तांदूळ-गव्हाच्या किंमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ, सरकारनं सांगितलं कारण

भाकरी महागणार! तांदूळ-गव्हाच्या किंमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ, सरकारनं सांगितलं कारण

गहू, तांदूळ आणि या दोन्हीच्या पीठामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता खाद्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

गहू, तांदूळ आणि या दोन्हीच्या पीठामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता खाद्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

गहू, तांदूळ आणि या दोन्हीच्या पीठामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता खाद्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई : एकीकडे रुपया घसरला आहे तर दुसरीकडे महागाई आणखी वाढण्याची चिंता आहे. याच दरम्यान एक वाईट बातमी आहे. सरकार तांदूळ आणि गव्हाच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय पीठावरील दरही वाढवणार आहे. याच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. खांद्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षात २० टक्के किंमत वाढली आहे. गहू, तांदूळ आणि या दोन्हीच्या पीठामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता खाद्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरता ९ ते २० टक्क्यांपर्यंत या किंमती वाढल्या आहेत आणि पुढेही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी खरीप हंगामात तांदूळ १०.४९ कोटी टन मिळेल असं अनुमान आहे. गेल्या वर्शी ११.१७ लाख टन उत्पादन आलं होतं. तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने तांदळाच्या किंमती वाढण्याची शक्यता पुढेही असेल असं खाद्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत देशातील तांदळाच्या किरकोळ किंमतीत 9.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गव्हाच्या किंमतीत 14.39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पीठं 17.87 टक्के महाग झाली आहे. घाऊक किंमतीबद्दल बोलताना, मागील वर्षाच्या तुलनेत ऑल इंडिया तांदळाची घाऊक किंमत १०.१6 टक्क्यांनी वाढली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात तांदळाचं उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी झाल्याने त्याचा फटका बसणार आहे. वर्षाला एकूण ६० ते ७० लाख टन तांदळाचं लक्ष्य होतं मात्र ४०-५० लाख उत्पादन होण्याची शक्यता आहे. वाढती निर्यात हे सगळ्यात मोठं कारण आहे ज्यामुळे किंमती वाढल्या आहेत. तांदळ्याच्या निर्यातीमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुकडा तांदळाला मोठी मागणी आहे. चार वर्षात जवळपास ४३ टक्क्यांनी ही मागणी वाढली आहे. त्यामुळे आता तांदळाच्या किंमती मोठ्या प्रमाणात पुढेही वाढू शकतात असं म्हटलं आहे.
First published:

Tags: Money, Share market

पुढील बातम्या