नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : कुठे फिरायला जाण्यासाठी प्रवास करायचा असो किंवा महत्त्वाच्या कामासाठी कोठे जायचं असले तरी, सामान किती नेणार आहे, पोर्टरचा वेगळा खर्च, घरातून विमानतळावर सामान आणून मग बोर्डिंग करणं आणि त्यानंतर मग कन्व्हेयर बेल्टवर वाट पाहत थांबणं. या सगळ्या झगझगीतून बाहेर पडण्यासाठी इंडिगोने खास सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत तुमचे साहित्य तुमच्या घरापासून तुम्ही जिथे जात आहात तिथे पोहोचवले जाईल.
इंडिगोने (IndiGo) म्हटले आहे की, आम्ही डोअर-टू-डोअर साहित्य ट्रान्सफर सेवा सुरू करत आहोत. जिथून तुमचा प्रवास सुरू होत आहे, तिथून सामान सुरक्षितपणे उचलले जाईल आणि तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं पोहोचवलं जाईल.
कोणत्या शहरांमध्ये ही सुविधा मिळणार
इंडिगोची ही विशेष सेवा सध्या बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई या मोठ्या शहरांसाठी सुरू करण्यात आली आहे. इंडिगोने म्हटले आहे की, ग्राहकांचा माल कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे उचलला जाईल आणि तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं पोहोचवला जाईल.
Explore India like never before with a range of our non-stop flights. Book now https://t.co/zrcJoVOmZg #LetsIndiGo #Aviation #Travel pic.twitter.com/OKdymtrCfk
— IndiGo (@IndiGo6E) November 5, 2021
किती पैसे द्यावे लागतील?
या सुविधेसाठी प्रवाशांना केवळ 325 रुपये मोजावे लागणार आहेत. या सेवेचे नाव 6eBagport (6EBagport) आहे, ज्याद्वारे ग्राहक फ्लाइट टेक ऑफ होण्यापूर्वी 24 तास आधी बॅगेज सेवेचा लाभ घेऊ शकतात. या सेवेसाठी कंपनी कार्टरपोर्टरसोबत भागीदारी करत आहे.
हे वाचा - Raj Thackeray यांचा नव्या घरात गृहप्रवेश, अमित ठाकरेंच्या हस्ते नव्या घराच्या नामफलकाचं पूजन
इंडिगोची अनेक मार्गांवर थेट विमानसेवा
>> इंडिगो 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरपासून दिल्ली पाटणा, पाटणा दिल्ली, पाटणा मुंबई आणि पाटणा हैदराबाद, बंगळुरू पाटणा मार्गांवर नवीन थेट उड्डाणे सुरू करणार आहे.
हे वाचा - रद्दी समजून व्यावसायिकाने कचऱ्यात फेकले 16 लाख रूपये; चूक समजताच केला पोलिसांना फोन पण…
>> इंडिगो 2 नोव्हेंबरपासून ओडिशातील भुवनेश्वर ते राजस्थानमधील जयपूरला जोडणारी थेट विमानसेवा सुरू करणार आहे.
>> कानपूर आणि दिल्ली दरम्यान 31 ऑक्टोबर 2021 पासून थेट विमानसेवा सुरू होणार आहे, तर 1 नोव्हेंबर 2021 पासून कानपूर हैदराबाद, कानपूर बंगलोर आणि कानपूर मुंबई दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.