इंडिगोच्या धमाकेदार ऑफर्स, स्वस्तात करा परदेशवारी

इंडिगोच्या धमाकेदार ऑफर्स, स्वस्तात करा परदेशवारी

इंडिगोमुळे तुम्ही देशात आणि विदेशात स्वस्त तिकिटांवर विमान प्रवास करू शकता

  • Share this:

मुंबई, 11 जून : विमान कंपन्या प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असते. इंडिगो एअरलाइन्स धमाकेदार  ऑफर  घेऊन आलीय. यामुळे तुम्ही देशात आणि विदेशात स्वस्त तिकिटांवर विमान प्रवास करू शकता. यासाठी तुम्हाला 11 जून ते 14 जून यामध्ये तिकिटं बुक करायला हवीत. त्यानंतर तुम्ही विमान प्रवास 26 जून ते 28 सप्टेंबर यामध्ये कधीही करू शकता.

तिकिटांची किंमत

इंडिगो एअरलाइन्सनं प्रवाशांसाठी शानदार  ऑफर  आणलीय. या  ऑफरमध्ये 10 लाख सीट्स उपलब्ध आहेत. यात तुम्ही स्वस्त तिकीट खरेदी करू शकता. देशात तुम्ही 999 रुपयांमध्ये प्रवास करू शकता. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास 3,499 रुपयांपासून सुरू होतोय.

PNB मध्ये होणार 'या' बँकांचं विलीनीकरण, ग्राहकांवर होणार परिणाम

नियम आणि अटी

या  ऑफरअंतर्गत काही नियम आणि अटी आहेत. 28 सप्टेंबरनंतर ही सूट नाही. तुम्हाला प्रवास करण्याआधी 15 दिवस आधी तिकीट बुक करायला लागेल. यात सरकारी आणि एअरपोर्ट अॅथोरिटीचं काही शुल्क लागणार नाही. ही आॅफर नाॅन स्टाॅप डोमेस्टिक आणि इंटरनॅशनलसाठी लागू होईल. या  ऑफरला इतर कुठल्या स्कीमला किंवा प्रमोशनला जोडून घेता येणार नाही.

खुशखबर, आता झीरो बॅलन्स खातेधारकांसाठी चेकबुक आणि ATM कार्ड मोफत

इंडिगो कॅशबॅक ऑफर्स

यात कॅशबॅक  ऑफरही आहे. तुम्ही इंडसइंड बँकेच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डानं तिकीट खरेदी करत असाल तर तुम्हाला 20 टक्के म्हणजे जवळजवळ 2 हजार रुपये कॅशबॅक मिळेल. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 हजार रुपये खर्च करावे लागतील.

नवी मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी 169 जागांवर भरती

ICICI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डानी पैसे दिलेत तर तुम्हाला 5 टक्के म्हणजे जवळजवळ एक हजार रुपये कॅशबॅक मिळेल. यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 हजार रुपये खर्च करावे लागतील. एकीकडे विमानप्रवास महाग होत असताना अशा आॅफर्स ग्राहकांना दिलासा देऊन जातात.VIDEO : जमीन हडपली का? धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: indigo
First Published: Jun 11, 2019 05:47 PM IST

ताज्या बातम्या