उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त 999 रुपयांत करा विमानप्रवास, 'या' आहेत ऑफर्स

उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त 999 रुपयांत करा विमानप्रवास, 'या' आहेत ऑफर्स

देशातला विमानप्रवास 999 रुपयांपासून सुरू होतो तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास 3499 रुपयांपासून सुरू होतो.

  • Share this:

मुंबई, 14 मे : इंडिगो ( IndiGo ) नं उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. यात देशात विमान प्रवास करायचा असेल तर तिकिटाची किंमत 999 रुपयांनी सुरू होतेय. तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचं तिकीट 3499 रुपयांनी सुरू होतं.  स्वस्त दराबरोबर विमानकंपनी प्री पेड एक्सेस बॅगेज सेवेवर 30 टक्के सूट देतं आहे. याशिवाय तुम्ही मोबिक्विकवरून तिकीट बुक केलंत तर बुकिंगवर एक हजार रुपयांचा कॅशबॅक मिळतोय. ही ऑफर दुसऱ्या कुणाला देता येत नाही. शिवाय ग्रुप बुकिंगवरही ही ऑफर लागू नाही.

Xioami च्या फॅन्सना खुशखबर, आता वेंडिंग मशीनमध्ये पैसे टाकून खरेदी करा स्मार्ट फोन

कधीपर्यंत तिकीट बुक कराल?

14 मे ते 16 मेपर्यंत तिकीट बुक करू शकता. देशातला विमानप्रवास 999 रुपयांपासून सुरू होतो तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास 3499 रुपयांपासून सुरू होतो. यासाठी 10 लाख सीट राखीव ठेवल्यात. 29 मेपासून 28 सप्टेंबरपर्यंतच्या प्रवासालाही तिकीट बुक करता येतं.

सावधान, WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका, कोणीही पाहू शकतं तुमचं चॅटबालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा नवा 'मास्टर प्लान'

1 हजार रुपयांचा कॅशबॅक

याशिवाय डिझिबँकेच्या डेबिट कार्डानं तुम्ही पैसे दिलेत तर 10 टक्क्यांचं डिस्काउंट मिळेल. त्यासाठी तुम्हाला 4 हजार रुपयांची देवाणघेवाण करावी लागेल. मोबिक्विक वॉलेटवरून पैसे दिले तर एक हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक मिळेल.

याशिवाय www.goindigo.in या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करता येईल.


शाळेतून घरी येत होती मुलं, वळूने मारली टक्कर, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: indigo
First Published: May 14, 2019 09:31 PM IST

ताज्या बातम्या