Home /News /money /

Indigo एअरलाइन्सला पुणेकरांनी दिला दणका, झुरळामुळे पडला एवढा भुर्दंड

Indigo एअरलाइन्सला पुणेकरांनी दिला दणका, झुरळामुळे पडला एवढा भुर्दंड

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात झुरळ आढळलं आणि त्याचा इंडिगो कंपनीला त्याचा चांगलाच भुर्दंड पडला.

    पुणे, 3 जानेवारी : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात झुरळ आढळलं आणि त्याचा इंडिगो कंपनीला त्याचा चांगलाच भुर्दंड पडला. स्कंद भारद्वाज आणि सुरभि भारद्वाज हे दोघं इंडिगोच्या विमानाने प्रवास करत होते. त्यावेळी विमानाच्या सीटच्या पॉकेटमध्ये त्यांना झुरळ दिसलं. सुरभि भारद्वाज यांनी ही बाब विमानातल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर तुम्ही ई मेल पाठवून तक्रार करा, असं उत्तर त्यांना मिळालं. विमानात असलेल्या प्रतिनिधीने त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन तोडगा काढला नाहीच शिवाय ई मेलने तक्रार करण्याचा सल्ला दिला. हेच उत्तर दोनदा एवढचं नाही तर सुरभि भारद्वाज यांनी जेव्हा दिल्ली एअरपोर्टच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊन विमानात झुरळ सापडल्याचे फोटो दाखवले तेव्हाही त्यांना ई मेल पाठवण्याचाच सल्ला मिळाला.दुसऱ्या एका प्रकरणात एका प्रवाशाने व्हीलचेअर मागितली होती. पण त्यालाही बऱ्याच मिन्नतवाऱ्या करून व्हीलचेअर मिळाली. इंडिगोच्या या कारभाराला कंटाळून या दोघांनी ग्राहक संरक्षण विभागाकडे तक्रार केली. (हेही वाचा : रुपया गडगडल्याने महागाईत आणखी भर, या गोष्टींना बसणार फटका) ग्राहक संरक्षण विभागाचे आदेश प्रवाशांची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळवणूक होऊ नये ही जबाबदारी एअरलाइनने घ्यायला हवी, असं ग्राहक संरक्षण विभागाने म्हटलं आहे. इंडिगो एअरलाइन्सने या दोन्ही प्रवाशांना तिकिटाची रक्कम द्यावी, असे आदेश देण्यात आले. एवढंच नव्हे तर 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असंही फर्मान काढण्यात आलं. स्कंद भारद्वाज आणि सुरभि भारद्वाज हे दोघंही कोथरुडचे राहणारे आहेत. या दोघा पुणेकरांनी इंडिगो एअरलाइन्सविरुद्ध केलेली तक्रार एअरलाइन्सला चांगलीच महागात पडली. ================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Indigo Airlines, Money

    पुढील बातम्या