Home /News /money /

Indian Railwaysचं मोठं लक्ष्य; ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्टेशनमध्ये मिळवणार 30 टक्के भागीदारी

Indian Railwaysचं मोठं लक्ष्य; ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्टेशनमध्ये मिळवणार 30 टक्के भागीदारी

भारतीय रेल्वेचं ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्टेशनमध्ये 2021-22 पर्यंत 20 टक्के आणि 2023-24 पर्यंत 30 टक्के भागीदारी मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं.

    नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : कोरोना संकटादरम्यान, भारतीय रेल्वेने (Indian Railways) काही वर्षात ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्टेशनमध्ये (Automobile Transportation) 30 टक्के भागीदारी मिळवण्याचं मोठं टार्गेट ठेवलं आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी, रेल्वेचं ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्टेशनमध्ये 2021-22 पर्यंत 20 टक्के आणि 2023-24 पर्यंत 30 टक्के भागीदारी मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं सांगितलं. गोयल यांनी, ऑटो इंडस्ट्रीतील (Auto Industry) दिग्गजांसह झालेल्या एका बैठकीत वाहनांना एका जागेहून दुसऱ्या जागी पोहचवण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा (Rail Network) अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. रेल्वेकडून अनेक राज्यांपर्यंत ट्रॅक्टरचं ट्रान्सपोर्टेशन पीयूष गोयल यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM),टाटा मोटर्स (Tata Motors), हुंदाई मोटर्स (Hyundai Motors), फोर्ड मोटर्स (Ford Mortors), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra), होंडा इंडिया (Honda India)आणि मारुती सुझुकी लिमिटेडसह (Maruti Suzuki Ltd.) ऑटोमोबाईल फ्रेट ट्रेन ऑपरेटर्स, ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत, रेल्वेने या क्षेत्रात 2021-22च्या शेवटापर्यंत 20 टक्के आणि 2023-24 पर्यंत 30 टक्के भागीदारी मिळवण्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने हरियाणातील फरीदाबाद ते उत्तर प्रदेशातील चौखंडी आणि बिहारच्या दानापूरपर्यंत ट्रॅक्टरची वाहतूक केली असल्याचं सांगितलं. भारतीय रेल्वेकडून बांगलादेश आणि नेपाळला ऑटोमोबाईलच्या निर्यातीसाठीही परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भारतीय रेल्वे आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री या दोघांनाही फायदा होणार असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं. यामुळे रेल्वेचं उत्पन्न वाढण्यासह, ऑटो इंडस्ट्रीला वाहनांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी कमी खर्च करावा लागेल, असंही सांगण्यात आलं आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या