मराठी बातम्या /बातम्या /मनी /रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 'गुडन्यूज', आता मिळणार...

रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 'गुडन्यूज', आता मिळणार...

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणार सूट

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणार सूट

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, भारतीय रेल्वे लवकरच कोविडमुळे बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा सुरु करू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 फेब्रुवारी: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सूटबाबत मोठी माहिती दिली आहे. अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, ‘रेल्वेच्या स्थायी समितीने किमान स्लीपर क्लास आणि थ्रीएसीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याच्या निर्णयाची समिक्षा करण्याचा आणि विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ' ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सवलत बहाल करावी, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती पुन्हा सुरू होणार!

कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊनही रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पुन्हा सुरू न करण्याच्या कारणांवरील दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना, रेल्वेमंत्री म्हणाले, 'सरकारने 2019-20 मध्ये प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सब्सिडी दिली. ही रक्कम रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरासरी 53% सवलतीची रक्कम आहे. ही सब्सिडी सर्व प्रवाशांसाठी सुरू आहे. दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्ण अशा अनेक श्रेणींसाठी या अनुदानाच्या रकमेतून पुढील सवलती सुरू राहतील.

IRCTC Tour: इंडियन रेल्वेचे हे टूर पॅकेज पाहिले का? स्वस्तात फिरुन या नॉर्थ ईस्ट

नियमांमध्ये होऊ शकतात बदल

रेल्वे बोर्डाने सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्याचा विचार आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची सब्सिडी कायम ठेवून या सवलतींचा खर्च कमी करण्याचा विचार आहे. आतापर्यंत,कोणत्याही अटी आणि शर्तींवर निर्णय घेतलेला नाही.

53 टक्के सूट मिळते

रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना भाड्यात सरासरी 53 टक्के सवलत मिळते. यासोबतच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांना या सूटशिवाय अनेक प्रकारच्या सवलती मिळतात.

LIC पॉलिसीमध्ये नॉमिनी बदलायचाय? ही आहे सोपी ट्रिक

कोणत्या क्लासमध्ये मिळेल सूट?

राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांना रेल्वे सवलतीबाबत विचारण्यात आले की, रेल्वे पुन्हा रेल्वे तिकिटांवर सवलत देणार का? यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2019-20 मध्ये रेल्वेने प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. याशिवाय स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सूट देण्याची सूचना संसदेशी संलग्न स्थायी समितीने केली आहे.

First published:

Tags: Central railway, Indian railway, Railway, Train