मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Railway Ticket: अवघ्या काही मिनिटात होईल रेल्वेचं कन्फर्म तिकीट बूक; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा

Railway Ticket: अवघ्या काही मिनिटात होईल रेल्वेचं कन्फर्म तिकीट बूक; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा

तत्काळ तिकीट बुक करताना वेळ सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही योग्य वेळी बुकिंग केले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला तिकीटही मिळेल, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

तत्काळ तिकीट बुक करताना वेळ सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही योग्य वेळी बुकिंग केले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला तिकीटही मिळेल, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

तत्काळ तिकीट बुक करताना वेळ सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही योग्य वेळी बुकिंग केले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला तिकीटही मिळेल, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

  मुंबई, 8 ऑगस्ट : भारतात रेल्वे प्रवासासाठी स्वस्त आणि सोपा पर्याय आहे. रेल्वेचं जाळं भारतातील कानाकोपऱ्यात पसरलं आहे. लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. कधी कधी असं होतं की अचानक ट्रेनने प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत आपण तत्काळ तिकीट काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र तुम्हाला तत्काळ तिकीट मिळेल हे काही निश्चित नसतं. ट्रेनमध्ये तत्काळ तिकीट बुक करणे ही मोठी डोकेदुखी आहे. कारण अनेक वेळा जेव्हा आम्ही तत्काळ तिकीट बुक करता आणि पेमेंट पर्यायापर्यंत जातो तेव्हा सर्व सीट्स फूल झालेल्या असतात आणि तत्काळमध्ये कन्फर्म रिझर्व्हेशन मिळू शकत नाही. पण आता जर तुम्हाला अचानक ट्रेनने प्रवास करायचा असेल आणि तिकीट मिळत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये कधीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला नेहमीच कन्फर्म तिकीट मिळेल. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याची माहिती घेऊयात. रेपो दरवाढीचा परिणाम; आतापर्यंत 4 बँकांकडून कर्जावरील व्याजदरात वाढ, तपासा नवे दर
  रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी काही बदल करत असते. यासोबतच आयआरसीटीसी तिकीट बुकिंग पर्यायामध्ये बदल करत आहे, जेणेकरून प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोपे होईल. यात, IRCTC ने आणखी एक मोठा बदल केला आहे, ज्यामुळे तुम्हाला तिकीट मिळण्यात अडचण येणार नाही. AC तत्काळ तिकीट बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते, तर स्लीपर क्लासचे बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. तत्काळ तिकीट बुक करताना वेळ सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही योग्य वेळी बुकिंग केले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला तिकीटही मिळेल, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
  तत्काळ तिकीट बुक करताना या गोष्टी लक्षात ठेवा >> सर्व प्रथम IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर लॉग इन करा. >>My Account वर जा आणि My Master List वर जा. >>त्यानंतर तुमची माहिती भरा. >>दिलेल्या 9 आयडीपैकी कोणतेही एक व्हेरिफाय करा. >>स्वत: व्यतिरिक्त, तुम्ही इतर कोणत्याही प्रवाशाची माहिती देखील भरू शकता. >>आता बुकिंगच्या वेळी प्रवाशांचे तपशील भरताना मास्टर लिस्ट आपोआप तयार होईल. >>इथून तुम्ही जास्त वेळ न घेता तुम्हाला जे अॅड करायचे ते करु शकता. >> आता पेमेंटचा पर्याय तुमच्यासमोर येईल. >> यानंतर, पेमेंट करण्यासाठी तुम्ही येथे UPI, क्रेडिट/डेबिट कार्ड वापरू शकता. Online Shoppingवर होईल मोठी बचत, 'या' खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स माय मास्टर लिस्ट तयार करण्याच्या फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही तकीट बुक करता तेव्हा तुम्हाला त्यात तपशील भरण्यात वेळ वाया घालवत नाही आणि तुम्ही तुमचा आधीच भरलेला तपशील निवडून थेट तिकीट बुक करण्याच्या पर्यायावर जाता. यासह, तुम्ही पेमेंट पर्यायावर इतरांपेक्षा लवकर पोहोचता आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Indian railway, IRCTC

  पुढील बातम्या