भारतीय रेल्वेच्या पहिल्या खासगी ट्रेनमध्ये मिळतील विमानासारख्या 'या' 6 सुविधा

भारतीय रेल्वेच्या पहिल्या खासगी ट्रेनमध्ये मिळतील विमानासारख्या 'या' 6 सुविधा

Indias Railway, Tejas Express - भारतीय रेल्वेची पहिली खासगी ट्रेन लवकरच धावणार आहे. यात विमानासारख्या काय काय सुविधा असतील ते पाहा

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : भारताची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. पहिल्यांदा ही ट्रेन लखनऊ आणि नवी दिल्लीच्या मधे चालवली जाईल. भारतीय रेल्वेनं ट्रायल म्हणून ही ट्रेन आयआरसीटीसीला द्यायचा निर्णय घेतलाय. या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा असतील. आरामदायी सीट्स, एलईडी लाइट, बायो टाॅयलेट, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडणारे दरवाजे अशा सुविधा ट्रेनमध्ये असतील.

रेल्वेच्या खासगीकरणाबद्दल बरेच दिवस चर्चा सुरू आहे. आता असं म्हणतात देशात पहिली खासगी ट्रेन दिल्ली ते लखनऊच्या मध्ये धावणार आहे.

नवोदय विद्यालय समितीत कमवू शकता 2 लाख रुपये, 2300पदांवर आहे भरती

1. IRCTC 100 दिवसांच्या आत ट्रेन सुरू करू इच्छितेय. दुसऱ्या मार्गांबद्दल लवकरच निर्णय होईल.

2. ही ट्रेन उत्तर प्रदेशच्या आनंद नगर रेल्वे स्टेशनमध्ये पार्क आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ट्रेनला खासगी कंपनीकडे सुपूर्द केलं जाईल.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

3. विमानाप्रमाणे या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटवर LCD स्क्रीन लावलेला आहे. प्रत्येक सीटवर अटेंडेंट बटण आहे. ते प्रेस करून तुम्ही सहाय्यकाला बोलवू शकता.

4. या ट्रेनमध्ये LED लाइट लावलेत. सिगरेट स्मोकिंग डिटेक्ट करण्यासाठी ऑटो डिटेक्टर लावलेत. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय. प्रत्येक सीटवर चार्जिंग आणि युएसबी केबल लावलीय.

सरकारच्या मदतीनं सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला कमवा 1 लाखाहून जास्त

5. ट्रेनला इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन ( IRCTC )कडे सोपवलं जाईल.

6. दिल्ली आणि लखनऊ मार्गावर आतापर्यंत सर्वात वेगवान ट्रेन स्वर्ण शताब्दी आहे. तिला पोचायला 6.30 तास लागतात.

विमानासारख्या असतील सुविधा

आरामदायी सीट्स, एलईडी लाइट, बायो टाॅयलेट, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडणारे दरवाजे अशा सुविधा ट्रेनमध्ये असतील.

ट्रेनचं तिकीट असेल महाग

या तेजस एक्स्प्रेसचं तिकीट शताब्दीपेक्षा 20 टक्के जास्त असेल. ट्रेनमध्ये मोटरमन आणि गार्ड भारतीय रेल्वेचं असतील.

गुगल पोहोचलं तुमच्या बेडरूमपर्यंत, तुमची माहिती सुरक्षित तर आहे ना?

First published: July 13, 2019, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading