नवी दिल्ली, 25 मे : रेल्वेचा इतिहास हा अनेक वर्षांपूर्वीचा आहे. एका शतकापूर्वीपासून लोक ट्रेनमधून प्रवास करत आहेत. त्याचप्रमाणे, भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क मानले जाते. त्याचा स्वतःचा एक गौरवशाली इतिहास आहे. यासोबतच याचे अनेक किस्से आहेत. सुमारे 177 वर्षे जुनी भारतीय रेल्वे दररोज सुमारे 40 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवते. यासह दररोज सुमारे 35 लाख टन माल त्यांच्या निश्चित स्थळावर देखील पोहोचवते.तुम्हाला भारतातील पहिल्या ट्रेनचा इतिहास माहीत आहे का? देशातील पहिली ट्रेन कोणती आहे आणि ती कुठून कुठे धावली हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेशी संबंधित अशाच अनेक रंजक गोष्टी सांगणार आहोत, या गोष्टी जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.
देशातील पहिल्या पॅसेंजर ट्रेनबद्दल बोललो तर, ती पहिल्यांदा 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे या बोरी बंदर दरम्यान धावली. या दरम्यान ट्रेनने एकूण 34 किमी अंतर कापले होते. या ट्रेनमध्ये एकूण 400 प्रवासी होते. लोकांमध्ये या पॅसेंजर ट्रेनबद्दल इतका उत्साह होता की त्यांनी त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. जेव्हा ट्रेन रुळावर उभी होती तेव्हा लोक रेल्वे रुळाची पूजा करत होते.
रेल्वेसोबत मिळून सुरु करा बिझनेस, कधीच कमी होणार नाही ग्राहकांच्या रांगा
बोरी बंदर स्टेशनवरुन बाहेर पडल्यानंतर ही गाडी 8 किलोमीटर चालल्यानंतर भायखळा येथे थांबली. जिथे रेल्वेच्या इंजिनमध्ये पाणी भरले होते. मग तिथून निघाल्यावर सायनमध्ये थोडावेळ स्टॉपेज राहिला. या संपूर्ण दीड तासाच्या प्रवासात ट्रेन दोन स्थानकांवर प्रत्येकी 15 मिनिटे थांबली. देशात रेल्वे चालवण्याचे काम सोपं नव्हतं. त्यासाठी कठोर परिश्रमही केले गेले आहेत. 1851 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान रुळ टाकण्यासाठी 10,000 पेक्षा जास्त मजूर कामावर होते. यानंतर या मार्गावर रेल्वे धावण्याचे स्वप्न साकार झाले.
IRCTC ने आणलंय खास 'डिवाइन हिमालयन टूर', स्वस्तात मस्त आहे पॅकेज!
ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर 1825 मध्ये पहिल्यांदा ब्रिटनमध्ये ट्रेन धावल्या. त्यात स्टॉकटन ते डार्लिंग्टन हे अंतर होते. पुढच्या काही वर्षात तिथले लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि सामान नेण्यासाठी ट्रेनचा वापर करू लागले. त्यानंतर 1832 मध्ये दक्षिण भारतातून ब्रिटिश अधिकाऱ्याकडे ब्रिटनच्या धर्तीवर भारतात ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आला. मात्र, यावेळी त्यावर फारसे काम होऊ शकले नाही. 1848 मध्ये लॉर्ड डलहौसी भारताचे गव्हर्नर जनरल झाले. यानंतर त्यांनी भारतात ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Railway, Train