मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Indian Railways: रेल्वेने बदलला तिकिट बुकिंगचा नियम, कोट्यवधी प्रवाशांवर होणार थेट परिणाम

Indian Railways: रेल्वेने बदलला तिकिट बुकिंगचा नियम, कोट्यवधी प्रवाशांवर होणार थेट परिणाम

भारतीय रेल्वेने (Indian Railway) ट्रेन तिकिट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहेत. जाणून घ्या काय आहे बदल

भारतीय रेल्वेने (Indian Railway) ट्रेन तिकिट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहेत. जाणून घ्या काय आहे बदल

भारतीय रेल्वेने (Indian Railway) ट्रेन तिकिट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहेत. जाणून घ्या काय आहे बदल

    नवी दिल्ली, 08 डिसेंबर: भारतीय रेल्वेने (Indian Railway) ट्रेन तिकिट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहे. आता प्रवाशांना रजिस्टर्ड असणारा क्रमांकच त्यांचा मोबाइल क्रमांक म्हणून प्रविष्ट करावा लागेल. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. अनेकदा काही प्रवाशी त्यांचे तिकिट दुसऱ्यांच्या अकाउंटमधून घेतात, अशावेळी त्यांचा संपर्क क्रमांक PRS प्रणाली मध्ये दाखल होत नाही. अशावेळी अनेकांना ट्रेन रद्द झाल्यास किंवा ट्रेनच्या वेळेत बदल झाल्यास माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत रेल्वेकडून केले जाणारे मेसेज या प्रवाशांपर्यंत पोहोचतच नाहीत. रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत विधानात असं म्हटलं आहे की, सर्व प्रवाशांना अशा सूचना करण्यात येत आहे की त्यांनी तिकिट बुक करताना त्यांचा संपर्क क्रमांक म्हणून रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकच द्या. ज्यामुळे रेल्वेच्या शेड्यूलमध्ये कोणता बदल झाल्यास तुम्ही अपडेट राहाल. याचा फायदा रेल्वे प्रवाशांना होईल. (हे वाचा-'पेट्रोलची किंमत 40 रुपये लीटर करावी', भाजप नेत्यानेच केली मागणी) आयआरसीटीसी आयडी आवश्यक प्रवासी IRCTC च्या माध्यमातून ऑनलाइन तिकिट बुकिंग करू शकतात. याकरता तुमच्याकडे आयआरसीटीसी अकाउंट असणं आवश्यक आहे. यावर तुम्हाला लॉग इन करावं लागेल, IRCTC चा आयडी पासवर्ड असणं आवश्यक आहे. जाणून घ्या वेबसाइटच्या माध्यमातून कशाप्रकारे बुकिंग कराल -IRCTC च्या  वेबसाइटवरून तिकिट बुक करण्यासाठी तुम्हाला  आधी याठिकाणी अकाउंट बनवावे लागेल. त्याकरता www.irctc.co.in या वेबसाइटवर जा. -यानंतर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा (हे वाचा-31 डिसेंबरपूर्वी 'हे' काम करा, अन्यथा भरावा लागेल 10000 रुपयांचा दंड) -त्यानंतर एक पेज ओपन होईल, त्याठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल -याठिकाणी तुम्हाला सर्व माहिती प्रविष्ट करावी लागेल. यामध्ये तुम्हाला युजर नेम, पासवर्ड, नाव, पत्ता, जेंडर, जन्मतारिख, व्यवसाय, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, सिक्योरिटी प्रश्न आणि त्याचे उत्तर, भाषा इत्यादी माहिती द्यावी लागेल. -त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड टाकून सबमिट करा. - याठिकाणी ओपन झालेल्या डायलॉग बॉक्समध्ये accept लिहिलेलं असेल, त्यावर क्लिक करा. -त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. तुमच्या युजरनेम आणि पासवर्डची माहिती ईमेलवर पाठवण्यात येईल. ज्यानंतर लॉग इन करून तुम्ही तिकिट बुक करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या