या ट्रेन्समधून आता कधीच करता येणार नाही प्रवास, 500 रेल्वे होतायंत बंद

या ट्रेन्समधून आता कधीच करता येणार नाही प्रवास, 500 रेल्वे होतायंत बंद

भारतीय रेल्वे (Indian Railway) आता रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहे. नवीन वेळापत्रकानुसार रेल्वे आता 500 ट्रेन्स बंद तर 10 हजार स्टॉप रद्द करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : भारतीय  रेल्वे (Indian Railway) आता रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहे. नवीन वेळापत्रकानुसार रेल्वे आता 500 ट्रेन्स बंद तर 10 हजार स्टॉप रद्द करणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संकट दूर झाल्यानंतर हे नवे वेळापत्रक लागू केले जाईल, जेव्हा पूर्वीसारखे रेल्वेचे संचालन सुरू होईल. एका मीडिया अहवालानुसार वेळापत्रकातील या बदलावानंतर भारतीय रेल्वेची कमाई वार्षिक 1500 कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल. रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry of Railway)अंदाजानुसार 1500 कोटी रुपयांची ही अनुमानित कमाई कोणतेही रेल्वेभाडे किंवा अन्य चार्ज वाढवल्याशिवाय होईल. वेळापत्रकात केलेले बदल आणि अन्य ऑपरेशन पॉलिसीमध्ये केलेल्या बदलानंतर हे उत्पन्न मिळेल. अद्याप कोणत्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, रेल्वेचा असा अंदाज आहे की या संपूर्ण नेटवर्कमध्ये पॅसेंजर ट्रेन सुविधांच्या सरासरी स्पीडमध्ये 10 टक्क्यांची वाढ होईल. भारतीय रेल्वेने आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांसह मिळूम झिरो बेस्ड टाइमटेबल तयार केले आहे.

नवीन वेळापत्रकामधील महत्त्वाच्या बाबी

-सरासरी, दरवर्षी 50 टकक्यांहून कमी ऑक्यूपेन्सी असलेल्या गाड्यांना या नेटवर्कमध्ये जागा मिळणार नाही. गरज भासल्यास या गाड्या अन्य गाड्यांमध्ये विलीन केल्या जातील. विलीन होण्यासाठी लोकप्रिय गाड्या निवडल्या जातील.

(हे वाचा-SBI ग्राहकांसाठी मोठी घोषणा! घरबसल्या मिळेल या 8 सुविधांचा फायदा)

- लांब पल्ल्याच्या गाड्यांचा 200 कि.मी. पर्यंत कोणताही थांबा असणार नाही. पण या दरम्यान एखादे मोठे असेल, तर गाडी तिथे थांबवली जाईल. एकूण 10 हजार स्टॉप रद्द करण्याची तयारी रेल्वे करीत आहे.

-सर्व पॅसेंजर ट्रेन्स 'हब अँड स्पोक मॉडेल'वर चालतील. 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त  लोकसंख्या असलेली शहरे हब असतील. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा स्टॉप याठिकाणीच असेल. छोट्या शहरांना अन्य ट्रेन्सनी या हब्सशी जोडले जाईल. याचे एक वेळापत्रक असेल.

(हे वाचा-दीड लाखांपर्यंत पगार? कोरोना संकटात ही कंपनी देणार 20000 महिलांना नोकरी)

-त्याचप्रमाणे मुख्य तीर्थस्थळे आणि पर्यटन स्थळांने देखील हबचा दर्जा दिला जाईल

-नवीन वेळापत्रकामुळे मुंबई लोकलसारख्या सबअर्बन नेटवर्क्स प्रभावित होणार नाही

-

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 5, 2020, 9:00 AM IST

ताज्या बातम्या