रेल्वेची नवी सेवा, फिंगर प्रिंटवरून 'असं' बुक होईल ट्रेनचं तिकीट

रेल्वेची नवी सेवा, फिंगर प्रिंटवरून 'असं' बुक होईल ट्रेनचं तिकीट

Indian Railway - रेल्वेनं एक नवी सेवा सुरू केलीय. त्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होणार

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : रेल्वेची सेवा चांगली करण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करतंय. पहिल्यांदाच भारतीय रेल्वेत तिकिटासाठी बायोमेट्रिक सिस्टिम वापरली जाणार आहे. रेल्वे मंत्रालय आरक्षित नसलेल्या किंवा जनरल डब्यात बायोमेट्रिक सिस्टिम वापरून तिकीट द्यायला सुरुवात करणार आहे. यामुळे प्रवाशांना सीट मिळणं सोपं जाईल, प्लॅटफाॅर्मवर तिकीट घेणं, धावत ट्रेन पकडणं या सगळ्यांपासून प्रवाशांची सुटका होईल. हा पायलट प्रोजेक्ट वेस्टर्न रेल्वे डिव्हिजनच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि बांद्रा टर्मिनलवर सुरू झालाय. यासाठी दोन्ही स्टेशन्सवर 2-2 बायोमेट्रिक मशीन्स लावलेत.

कसा होईल वापर?

जनरल डब्यांसाठीचं तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना बायोमेट्रिक मशीनवर आपलं फिंगप्रिंट द्यावं लागेल. त्यानंतर एक टोकन जनरेट केलं जाईल. हा टोकन नंबर प्रत्येक जनरल क्लासच्या सीट नंबर्सप्रमाणे दिला जाईल.

LIC ची नवी पाॅलिसी, रोज 28 रुपये करा जमा आणि मिळवा लाखो रुपये

त्यानंतर रेल्वे प्रवाशांना आपल्या टोकन नंबराच्या क्रमात एका लाइनमध्ये उभं राहावं लागेल. एक RPF स्टाफ एंट्री पाॅइंटवर उभा असेल. तो नंबर तपासेल आणि प्रवाश्याला डब्यात त्या ऑर्डरप्रमाणे एंट्री देईल.

या ट्रेन्सच्या जनरल डब्यासाठी ही सिस्टिम आहे

अमरावती एक्स्प्रेस (मुंबई सेंट्रल स्टेशन)

जयपुर सुपरफास्ट एक्स्प्रेस (मुंबई सेंट्रल स्टेशन)

कर्णावती एक्स्प्रेस (मुंबई सेंट्रल स्टेशन)

3 ते 5 वर्षाचा नोकरीचा अनुभव आहे? मग पुढच्या 6 महिन्यांत अशी मिळेल मोठी संधी

गुजरात मेल (मुंबई सेंट्रल स्टेशन)

गोल्डेन टेंपल मेल (मुंबई सेंट्रल स्टेशन)

पश्चिम एक्स्प्रेस (बांद्रा टर्मिनस)

अमरावती एक्स्प्रेस (बांद्रा टर्मिनस)

अवध एक्स्प्रेस (बांद्रा टर्मिनस)

महाराष्ट्र संपर्क क्रांति एक्स्प्रेस (बांद्रा टर्मिनस)

फक्त 100 रुपयांत Post Office मध्ये उघडा खातं, FD पेक्षा होईल जास्त फायदा

स्वयंपाकाच्या गॅसवर सबसिडी सोडण्याचा पर्याय ग्राहकांना आहे. तसाच आता रेल्वेच्या तिकिटांवरही लागू होणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसवरची गिव्ह इट अप योजना यशस्वी झाल्याचा दावा सरकारनं केलाय. त्यामुळे आता ऑनलाइनवर तिकीट बुक केलं तर प्रवाशांना त्यावरची सबसिडी सोडण्याची संधी मिळेल. सूत्रांच्या माहितीनुसार IRCTC च्या वेबसाइटवर तिकीट खरेदी करण्याच्या वेळी सबसिडी सोडण्याचा पर्याय दिला जाईल. तो घ्यायचा की नाही हे प्रवाशांवर अवलंबून आहे.

VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे हेच ते नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गुप्त बैठकीचा हा पुरावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 07:04 PM IST

ताज्या बातम्या