रेल्वेची नवी योजना! तुमच्या जास्तीच्या सामानाची होणार Home Delivery

रेल्वेची नवी योजना! तुमच्या जास्तीच्या सामानाची होणार Home Delivery

भारतीय रेल्वेने (Indian Railway) 'बुकबॅगेज' (bookbaggage) नावाचं एक नवीन app सुरू केलं आहे. तुमचं सामान हवं त्या ठिकाणी पाठवण्याची सोय यातून करू शकाल. किती येतो याचा खर्च? जाणून घ्या

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी: रेल्वेमध्ये जास्तीचं सामान घेऊन प्रवास करणार्‍यांसाठी भारतीय रेल्वेने एक विशेष योजना सुरू केली आहे. त्यामुळे जास्तीचं सामान घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या सामानाची चिंता करण्याची गरज नाही. यासाठी रेल्वेने 'बुकबॅगेज' नावाचं एक नवीन अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून भारतीय रेल्वे तुमच्या सामानाचं हव्या त्या ठिकाणी वितरण करू शकणार आहे. म्हणजेच तुम्हाला जर तुमच्या घरातून सामान पिक अप करायचं असेल, तर ते कामही रेल्वेतर्फे केलं जाणार आहे. शिवाय हे सामान योग्यप्रकारे सॅनिटाइज आणि पॅकींग करुन तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोहचवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातून संबंधित पार्सल रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याचा आणि इतर ताण वाचणार आहे.

या व्यतिरिक्त ट्रेन डेस्टिनेशन स्टेशनवर आल्यानंतर, तुमचं सामान बर्थमधून उतरवलंही जाणार आहे. असं असलं तरी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना प्रति बॅग 125 रुपये द्यावे लागणार आहेत. बॅग वाहतुकीपासून ते हेलकऱ्यापर्यंत (कुली) सर्व खर्च रेल्वे करणार आहे. यासाठी आपल्याला कोणतंही आगाऊ शुल्क देण्याची आवश्यकता नाही. रेल्वे विभागाने या सेवेला एका खास अ‍ॅपशी जोडलं आहे. ही सुविधा विशेषतः वयोवृद्ध प्रवाश्यांसाठी सोयीची असणार आहे.

तुम्ही तुमच्या वस्तूंना ट्रॅक करू शकता

सर्वप्रथम तुमचं सामान अल्ट्राव्हायलेट किरणांनी 360 डिग्री पर्यंत स्वच्छ केलं जाईल. त्यानंतर हे सामान सुरक्षितपणे पॅक केलं जाईल. जेणेकरून तुमच्या वस्तूंना कोणतीही हानी पोहचणार नाही. याशिवाय या अ‍ॅपच्या मदतीनं तुम्ही तुमच्या सामानाचं जीपीएस ट्रॅकिंगही करू शकता.

3 तास अगोदर वस्तू स्विकारल्या जातील

तुम्ही तुमच्या मोबाइलवर बुकबॅगेजचं अॅप डाउनलोड करुन या सेवेचा लाभ घेऊ शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही सामानाचं बुकिंग करू शकता. तुम्ही होम डिलीव्हरी प्रकारची बुकिंग केली तर रेल्वे सुटण्याच्या तीन तास अगोदर तुमच्या घरातून तुमचं सामान पिक यअप केलं जाईल.

एका बाजूसाठी केवळ 125 रुपये खर्च करावे लागतील

त्याचबरोबर ट्रेन सुटण्यापूर्वी 15 मिनिटं अगोदर तुमचं सामान तुमच्या डब्यापर्यंत पोहचवलं जाईल. याशिवाय रेल्वे गाडी डेस्टिनेशन स्टेशनवर पोहोचल्यानंतर तुमचं सामान पुढच्या तीन तासात तुमच्या घरापर्यंत पोहचवलं जाईल. त्यासाठी प्रवाशाला एका बाजूचे एका बॅगसाठी 125 रुपये द्यावे लागतील. तर डेस्टिनेशन स्टेशनपासून सामान तुमच्या घरी पोहचवण्यासाठी वेगळे 125 रुपये द्यावे लागतील.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 1:42 PM IST

ताज्या बातम्या