रेल्वेची नवी योजना, तिकीट बुक करताना मिळेल 'हा' नवा पर्याय

Indian Railway - तुम्ही रेल्वेनं प्रवास करणार असाल तर तिकीट बुकिंग करताना एक नवा पर्याय मिळणार आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 01:40 PM IST

रेल्वेची नवी योजना, तिकीट बुक करताना मिळेल 'हा' नवा पर्याय

मुंबई, 20 जुलै : स्वयंपाकाच्या गॅसवर सबसिडी सोडण्याचा पर्याय ग्राहकांना आहे. तसाच आता रेल्वेच्या तिकिटांवरही लागू होणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसवरची गिव्ह इट अप योजना यशस्वी झाल्याचा दावा सरकारनं केलाय. त्यामुळे आता ऑनलाइनवर तिकीट बुक केलं तर प्रवाशांना त्यावरची सबसिडी सोडण्याची संधी मिळेल. सूत्रांच्या माहितीनुसार IRCTC च्या वेबसाइटवर तिकीट खरेदी करण्याच्या वेळी सबसिडी सोडण्याचा पर्याय दिला जाईल. तो घ्यायचा की नाही हे प्रवाशांवर अवलंबून आहे.

प्रवाशांना 47 टक्के सबसिडी देते रेल्वे

भारतीय प्रवाशांना रेल्वे तिकिटावर 47 टक्के सबसिडी देते. सबसिडीची भरपाई भाड्यातून केली जाते. यासाठी सोशल मीडिया, रेल्वे तिकिटाच्या मागे, ट्रेनच्या डब्यात आणि जाहिरातीद्वारे रेल्वे याबद्दल जागरुकता वाढवेल. ही स्कीम पुढच्या महिन्यापासून सुरू होऊ शकते.

LIC ची खास पाॅलिसी, 15 रुपये खर्च करून होईल लाखो रुपयांचा फायदा

रेल्वेला झाला 78 कोटींचा फायदा

Loading...

रेल्वे बोर्डाच्या चेअरमननं एका प्रोग्रॅममध्ये सांगितलं होतं की प्रवाशांच्या तिकीट भाड्यात रेल्वेचं नुकसानच होतंय. अगोदर ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत सोडण्याचा पर्याय दिला होता. त्यात 40 लाख ज्येष्ठ नागरिकांनी सबसिडी सोडली होती. यामुळे रेल्वेला जवळजवळ 78 कोटींचा फायदा झाला.

जीवलग मित्रांचा हा सेल्फी ठरला अखेरचा, भीषण अपघातातील मृतांची 'ही' आहेत नावं

दरम्यान,भारताची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. पहिल्यांदा ही ट्रेन लखनऊ आणि नवी दिल्लीच्या मधे चालवली जाईल. भारतीय रेल्वेनं ट्रायल म्हणून ही ट्रेन आयआरसीटीसीला द्यायचा निर्णय घेतलाय. या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा असतील. आरामदायी सीट्स, एलईडी लाइट, बायो टाॅयलेट, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडणारे दरवाजे अशा सुविधा ट्रेनमध्ये असतील.

एअर इंडियात नोकरीची मोठी संधी, 335 जागांवर होतेय भरती

रेल्वेच्या खासगीकरणाबद्दल बरेच दिवस चर्चा सुरू आहे. आता असं म्हणतात देशात पहिली खासगी ट्रेन दिल्ली ते लखनऊच्या मध्ये धावणार आहे.

VIDEO: पुण्यात जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...