मुंबई, 17 ऑक्टोबर: एक काळ होता, जेव्हा लोक रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी रेल्वे स्टेशन बुकिंग काउंटरवर लांबच लांब रांगेत उभे असायचे. परंतु आता बदलत्या काळानुसार यामध्ये बदल झाला आहे. भारतीय रेल्वे हा सर्वसामान्य भारतीय लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो. दररोज करोडो लोक रेल्वेच्या सेवेचा लाभ घेतात. अनेक वेळा अचानक कुठेतरी प्रवासाचा बेत आखावा लागतो. अशा परिस्थितीत, तत्काळ बुकिंग (Indian Railway Tatkal Ticket Booking) ही सेवा रेल्वेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याद्वारे तुम्ही प्रवासाच्या 24 तासांच्या आत कन्फर्म तिकीट मिळवू शकता. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मार्फत, तुम्हाला वेबसाइटवर तत्काळ तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते, परंतु प्रवासी अनेकदा तक्रार करतात की त्यांना आरक्षण मिळालेलं नाही.
ते बुकिंग तपशील भरेपर्यंत सर्व तिकिटे बुक झालेली असतात. अशा परिस्थितीत IRCTC नं एक मार्ग सांगितला आहे, ज्याद्वारे तुम्ही कन्फर्म तिकीट बुकिंग मिळवू शकता. ही मास्टर लिस्टची सुविधा आहे. जर तुम्हाला एसी क्लासमध्ये तत्काळ तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही सकाळी 10 नंतर हे बुकिंग करू शकता. तर नॉन-एसी डब्यांचे बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. मास्टर लिस्टची सुविधा काय आहे आणि या सुविधेद्वारे तुम्ही तत्काळ तिकीट बुक करताना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कशी वाढवू शकता, हे पाहूया.
मास्टर लिस्ट सुविधा काय आहे?
IRCTC रेल्वे प्रवाशांना बुकिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मास्टर लिस्ट बनवण्याचा सल्ला देते. ज्या व्यक्तीला त्याचे तत्काळ तिकीट बनवायचं आहे त्यानं आपलं नाव आणि वय अगोदर सेव्ह करावं आणि ते IRCTC च्या मास्टर लिस्टमध्ये सेव्ह करावं. यामध्ये तुम्ही एक किंवा अधिक प्रवाशांची मास्टर लिस्ट (IRCTC मास्टर लिस्ट) तयार करू शकता. यानंतर ट्रेनमध्ये तत्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांचे तपशील भरण्याऐवजी, तुम्ही मास्टर लिस्टमधून काही सेकंदात सर्व तपशील भरू शकता. यानंतर तुम्ही लगेच पैसे भरून कन्फर्म तिकीट मिळवू शकता. या सुविधेची खास गोष्ट म्हणजे बुकिंग करताना प्रवाशांचा वेळ वाचतो, ज्यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. लक्षात ठेवा की एकदा मास्टर लिस्ट तयार झाली की, तुम्ही ही यादी जोपर्यंत डिलीट करत नाही, तोपर्यंत ती तुमच्या IRCTC आयडीमध्ये सेव्ह केली जाईल.
हेही वाचा: फायद्याची बातमी! ‘या’ दोन बँकांनी वाढवले FDचे व्याजदर, किती होणार फायदा?
अशी बनवा मास्टर लिस्ट -
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway