मराठी बातम्या /बातम्या /मनी /ट्रेनमध्ये 'या' लोकांना मिळू शकते भाड्यामध्ये सूट, जाणून घ्या काय आहेत रेल्वेचे नियम?

ट्रेनमध्ये 'या' लोकांना मिळू शकते भाड्यामध्ये सूट, जाणून घ्या काय आहेत रेल्वेचे नियम?

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट भाड्यात 50 टक्के सूट मिळू शकते. भारतीय रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सवलत बहाल करू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 22 मार्च : भारतातील सर्वाधिक लोक हे रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. कारण रेल्वे हे स्वस्त आणि सोयीचं साधन आहे. दरम्यान आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना खुशखबर मिळू शकते. पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट भाड्यात 50 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीदरम्यान बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेली सवलत भारतीय रेल्वे लवकरच बहाल करू शकते. संसदेच्या एका समितीने रेल्वे मंत्रालयाला विनंती केली आहे की, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सूट पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर क्लास, थ्री एसी मधील तिकीट भाड्यात सूट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाने या मागणीचा विचार केल्यास ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा सूट मिळू शकते. तसेच डिसेंबर 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं होतं की तिकिट भाड्यात सवलत सध्या पुन्हा बहाल केली जाऊ शकत नाही. या मागचं कारण सांगताना ते म्हणाले की, रेल्वेचे पेन्शन आणि पगाराचे बिल खूप जास्त आहे. रेल्वेवर खर्चाचा बोजा पूर्वीपेक्षा जास्त आहे.

सहकारी बँका FD वर देताय 9 टक्के व्याज, पण धोके माहितीये का?

53 टक्के सवलत उपलब्ध होती

रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना भाड्यात सरासरी 53 टक्के सवलत मिळते. यासोबतच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांना या सूटसोबतच अनेक प्रकारच्या सवलती मिळतात. याआधीही ज्येष्ठ नागरिकांना अशी सूट मिळत होती, परंतु कोरोना महामारीच्या काळात मार्च 2020 मध्ये ती मागे घेण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जातेय.

सर्व ट्रेनमध्ये मिळत होती सूट

रिपोर्टनुसार, समितीने नमूद केलेय की भारतीय रेल्वे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना भाड्यात 40 टक्के सवलत द्यायची. तर किमान वय 58 वर्षे असताना महिलांना 50 टक्के सवलत दिली जात होती. सर्व मेल, एक्स्प्रेस, राजधानी, शताब्दी, दुरांतो ट्रेनमधील रेल्वे तिकिटांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना या सवलती मिळत होत्या. कोरोनाच्या काळात रेल्वेने तिकीट भाड्यातील ही सवलत मागे घेण्यात आली होती.

First published:
top videos

    Tags: Indian railway, Railways